शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ; ०९ नोव्हेंबरपर्यंत चालणार

By समीर नाईक | Published: October 18, 2023 5:29 PM

सदर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे.

समीर नाईक, पणजी:  राज्यात होणारी ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उद्यापासून सुरू होत आहे. अनेक वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे राज्यात होत असल्याने राज्यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. ९ नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.  गुरुवार १९ रोजी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे बॅडमिंटन या क्रीडा प्रकारापासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्यांनतर नेटबॉल, जिमनॅस्टिक, बास्केटबॉल, यासारखे क्रीडा प्रकार होणार आहे. 

२६ रोजी पंतप्रधानाच्याहस्ते अधिकृत उद्घाटन 

१९ पासून स्पर्धा सुरू होत असली तरी सदर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे भव्य स्वरुपात या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार, इतर मंत्री, आमदार व देशातील प्रसिद्ध क्रीडापटू उपस्थित राहणार आहे. 

पोलिसांच्या रजा रद्द, प्रशिक्षणार्थी पोलिसही असणार बंदोबस्तात 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पोलीसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच स्पर्धा संपेपर्यंत त्यांना रजाही देण्यात येणार नाही, याबाबतचा आदेश पोलीस अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी काढला आहे. तसेच स्पर्धेच्या बंदोबस्तासाठी दिल्ली येथे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलना बोलावण्यात आले आहे. याशिवाय केंद्राकडून अतिरिक्त कंपनी सेवेसाठी मागविण्यात आले आहे.

हजार पेक्षा जास्त गोमंतकीय खेळाडूंचा सहभाग 

या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद राज्याला मिळाले असल्याने प्रत्येक क्रीडा प्रकारात गोव्याला थेट प्रवेश मिळाला आहे, पण काही क्रीडा प्रकारासाठी राज्यात संघटना नसल्याने सुमारे ६-७ क्रीडा प्रकार वगळता सर्व क्रीडा प्रकारात गोव्याचे संघ सहभाग घेणार आहे. यातून सुमारे एक हजारपेक्षा जास्त गोमंतकीय खेळाडू सहभागी होत आहे.

७ ते ८ हजार विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांना पाहता यावी यासाठी शिक्षण खात्याकडून परिपत्रक जारी केले होते, यानुसार सुरुवातीच्या काळात सुमारे ४ हजार विद्यार्थी स्पर्धा दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थिती लावणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, पण जशी जशी स्पर्धा जवळ येत आहे, तसे तसे ही संख्या वाढू लागली असून आता जवळपास ७ ते ८ हजार विद्यार्थी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :goaगोवा