वास्को : दक्षिण गोव्यातील दाबोळी जंक्शनजवळील महामार्गावर ‘कोंक्रीट मिक्सर’ ट्रक आणि सायकल यांच्यात शनिवारी (दि.८) झालेल्या अपघातात खर्कप्रसाद भरडू जैशी नामक व्यक्तीचा ट्रकखाली येऊन जागीच मृत्यू झाला. दाबोळी जंक्शनवर पडलेले ‘ट्राफीक सिग्नल’ सुटल्यानंतर सायकलवरील खर्कप्रसाद यांनी बोगमाळोच्या दिशेने जाण्यासाठी वळण घेतले असता त्याच्या सायकलला ‘कोंक्रीट मिक्सर’ ट्रकने धडक दिल्याने तो ट्रकच्या चालाखाली येऊन ठार झाला.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी संध्याकाळी ५,३० वाजता तो अपघात घडला. इतर काही वाहनाबरोबरच दाबोळी विमानतळाच्या बाजूतून वेर्णाच्या दिशेने जाणारा तो ‘कोंक्रीट मिक्सर’ ट्रक दाबोळी जंक्शनसमोर पोचला असता तेथे ‘ट्राफीक सिग्नल’ पडल्याने थांबला. सायकल वरून जाणारा खर्कप्रसाद सुद्धा ‘ट्राफीक सिग्नल’ पडल्याने महामार्गावर त्या ट्रकच्या बाजूने थांबला अशी माहीती घटनेवेळी तेथे उपस्थित असलेल्या काहींनी दिली. सिग्नल सुटल्यानंतर खर्कप्रसाद ने सायकल बोगमाळोच्या दिशेने जाण्यासाठी वळवली असता मागून त्याच्या सायकलला त्या ट्रकने जबर धडक दिली. त्या अपघातात खर्कप्रसाद याचे डोके ट्रकच्या चाकाखाली येऊन तो जागीच ठार झाला.
अपघातात मरण पोवलेल्या खर्कप्रसाद यांची ओळख पटण्यास कठीण झाल्याने तो कोण आहे ते जाणण्यासाठी पोलीसांनी त्याच्याशी संबंधित कागदपत्रे तपासण्याबरोबरच इतरांशी चौकशी करावी लागली. त्यानंतर मरण पोचलेली संबंधित व्यक्ती खर्कप्रसाद (वय ४५) असून मूळ महाराष्ट्रातील असल्याचे उघड झाले.
अपघातात मरण पोचलेला खर्कप्रसाद गोव्यात दाबोळी भागात की अन्य कुठे राहतो त्याबाबत पोलीस तपास करत असल्याची माहीती उपनिरीक्षक रोहन नागेशकर यांनी दिली. वास्को पोलीसांनी त्या अपघाताचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून खर्कप्रसाद याचा मृतदेह मडगाव जिल्हा इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला आहे. वास्को पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अपघाताचा अधिक तपास चालू आहे.
खायला घेऊन जात होता -दाबोळी जंक्शनसमोर अपघात होऊन मरण पोचलेला खर्कप्रसाद सायकलवरून जाताना काही खाद्यपदार्थ घेऊन जात असल्याची माहीती तेथे असलेल्या काही नागरिकांनी दिली. खाद्यपदार्थ घेऊन बोगमाळोच्या दिशेने सायकलवरून वळण घेतल्याने महाराष्ट्रा येथील मूळ खर्कप्रसाद दाबोळी अथवा बोगमाळो भागात राहणारा असवा असा संशय असून पोलीस त्याबाबत शनिवारी रात्री चौकशी करत होते.