पणजी : राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी ५० मतदारसंघांतून एकूण ४९ उमेदवारी अर्ज सादर झाले. त्यापैकी २८ उमेदवारी अर्ज हे अपक्ष उमेदवारांचे आहेत. उमेदवारी अर्ज सादर करण्यास येत्या शनिवारी अखेरची मुदत आहे. तिसवाडी तालुक्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघातून मंगळवारी ८ अर्ज सादर झाले. सांताक्रुझमधून मगो पक्षातर्फे दिशा कवळेकर, तर चिंबलमधून त्याच पक्षातर्फे संदीप वेर्णेकर यांनी उमेदवारी सादर केली. सुदेश कळंगुटकर यांनी चिंबलमधून अपक्ष अर्ज सादर केला. पेडणे तालुक्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघांतून नऊ उमेदवारी अर्ज सादर झाले. ते सर्व अपक्ष आहेत. डिचोली तालुक्यातून सहा अर्ज सादर झाले. बार्देसमधील जि. पं. मतदारसंघातून १३ उमेदवारी अर्ज सादर झाले. त्यात दहा उमेदवार भाजपचे आहेत. फोंडा तालुक्यातून एक अर्ज मंगळवारी सादर झाला. मुरगावमधून तीन, तर धारबांदोडा तालुक्यातील मतदारसंघातून दोन उमेदवारी अर्ज सादर झाले. सासष्टीतून पाच, तर काणकोणमधून दोन उमेदवारी अर्ज सादर झाले. (खास प्रतिनिधी)
४९ उमेदवारांचे अर्ज
By admin | Published: March 04, 2015 1:55 AM