लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: विर्डी येथील धरण हे मातीचे आहे. आता महाराष्ट्राकडून या परिसरात तब्बल पाच धरणे उभारण्याचा प्रस्ताव असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. कर्नाटकनंतर महाराष्ट्रानेही राज्यावर जलसंकट आणण्याची तयारी चालवली असून, यावर तातडीने हालचाली न केल्यास राज्यात बिकट अवस्था होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सोमवारी गोव्याच्या पथकाने विर्डी भागास भेट देऊन पाहणी केली व आपला अहवाल सरकारला सादर केला. या बाबतीत कोणती कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. उपलब्ध माहितीनुसार व महारष्ट्रातील सूत्रांकडून केलेल्या दाव्यानुसार, महाराष्ट्राने धरण उभारणीसाठीचे परवाने मिळवलेले आहेत. त्यानंतरच काम सुरू केल्याचा दावा केला आहे. मात्र, लवादाने काही नियम घातलेले असल्याने केंद्रीय जल आयोगाची परवानगी बंधनकारक असल्याने या बाबतीत त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, विर्डीत सुरू असलेल्या कामाचे महाराष्ट्राने परवाने घेतल्याचे म्हटले आहे. मात्र, या दाव्यांची सत्यता पडताळून पाहण्यात येत असून, लवकरच अधिकृत माहिती समोर येईल, अशी माहिती गोव्याच्या जलस्रोत खात्याच्या अधिकान्यांनी दिली.
इथे उभारणार धरणे
महाराष्ट्राने पाण्यासाठी धरणांची जय्यत तयारी केली आहे. विर्डी भागात तसेच शीडबाचे मळ धनगरवाडी, मोराची राय, आमडगाव माटणे या भागात पाच छोटी धरणे उभारण्याचा आराखडा तयार केलेला आहे. अशी माहिती राजेंद्र केरकर यांनी दिली.
...म्हणे गोव्यावर परिणाम नाही
आमचे काम योग्य प्रकारे सुरू आहे. याबाबत आवश्यक असणारे परवाने घेण्यात आले आहेत. त्यामुळे विर्डी धरण परिसरात कामे सुरु आहेत. मात्र, यामुळे गोव्यावर कोणताही परिणाम होणार आहे. वस्तुस्थिती न पाहता, अभ्यास न करता काही मंडळींकडून गोव्यात अफवा पसरवण्याचे काम सुरु असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रातील लोकांनी व्यक्त केली आहे.
केसरकर यांनी तातडीने बैठक घ्यावी
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात हे धरण है। होत आहे. या संदर्भात केसरकर यांनी जलसंपदा विभाग अधिकारी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, लवाद समिती सदस्य यांची बैठक घेऊन कामाबाबत स्पष्टता करावी. मात्र, या कामामुळे गोव्यावर परिणाम होणार असल्याचा दावा निराधार असल्याचे केसरकर यांचे म्हणणे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"