किशोर कुबल, पणजी : गोव्यात मानवी हक्क आयोगाकडे ५०० हून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. न्यायमूर्ती उत्कर्ष बाक्रे यांचा कार्यकाळ गेल्या फेब्रुवारीत संपल्यानंतर नवा आयुक्त नेमलेला नाही. ही नियुक्ती तातडीने केली जावी, अशी मागणी विरोधी पक्ष गोवा फॅारवर्डने मुख्य सचिवांना पत्र लिहून केली आहे.
लोकांच्या तक्रारींवरुन चौकशी करणे, न्याय देणे व लोकांचे हक्क अबाधित राखणे आयोगाचे कर्तव्य आहे. आयुक्त नसल्याने तक्रारी पडून आहेत. लोकांना न्याय मिळू शकलेला नाही. लोकांना कोर्टात जावे लागते व सर्वसामान्यांसाठी ते खर्चिक व न परवडणारे आहे. नियुक्ती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने केली जावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.
मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यानंतर दाद मागण्यासाठी लोक आयोगाडे जातात परंतु गेले सात महिने आयोगाला वालीच राहिलेला नसल्याने दाद मागावी कोणाकडे? असा प्रश्न लोकांना पडला आहे.