शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

पर्वरीतील गुंतवणूकदारांना ५.८० कोटींचा गंडा; कंपनी मालकाविरोधात तक्रार

By मयुरेश वाटवे | Published: April 04, 2023 5:36 PM

त्या रकमेपोटी त्याना आपल्या कंपनीतून स्वस्तात सोने (नाणी, बिस्किट) देण्याची हमी दिली होती.

पणजी - पर्वरी आणि इतर भागातील लोकांना एजंट म्हणून नेमून इतर लोकांकडून आपल्या सुवर्ण कंपनीत पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून सुमारे ५ कोटी ७९लाख ७७ हजार रुपयांना ठकवल्याबद्दल पर्वरी पोलीस स्थानकात कंपनीच्या मालकाविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुकूर येथील प्रभू एन्क्लेव्हमध्ये राहणारा अक्षय अनंत सावंत (मूळ मुंबईचा रहिवासी) याच्याविरुद्ध पर्वरी येथील मोहमद शरीफ वासिम खान आणि इतर चौघांनी फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. अक्षयने श्री व्यंकटेश्वर बुलियन गोल्ड नामक कंपनीसाठी मोहमद आणि इतरांची नेमणूक केली होती. त्यांच्यामार्फत गुंतवणूकदारांकडून एकूण ५ कोटी ७९लाख ७७ हजाररुपये एवढी रक्कम गोळा करून आपल्या कंपनीत हस्तांतरित केली होती.

त्या रकमेपोटी त्याना आपल्या कंपनीतून स्वस्तात सोने (नाणी, बिस्किट) देण्याची हमी दिली होती. हा सर्व व्यवहार फेब्रुवारी २०२३ या महिन्यात घडला . तक्रारदारांना या व्यवहारासंबंधात संशय आल्याने त्यांनी अक्षयकडे पैशांसाठी तगादा लावला असता त्यांना सोने किंवा रक्कम देण्यात आली नाही. या संबंधांत तक्रारदारांनी पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी अक्षयविरुद्ध भा.दं.सं.४२० कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतीक प्रभू भट पुढील तपास करीत आहेत.