नारायण गावस, पणजी: महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पणजी स्मार्ट सिटीच्या कामाची गुरुवारी पाहणी केली. स्मार्ट सिटीचे कामे ९० टक्के पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी खाेदलेले खड्डे आहे ते पुढील दोन ते चार दिवसभर पूर्ण केेले जाणार आहे, असे मंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले यावेळी त्यांच्यासोबत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी आधिकारी संजित रॉड्रिग्ज व इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले, पणजी स्मार्ट सिटीने खोदलेल्या रस्त्यांची बहूतांश कामे पूर्ण झाली आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कामे पूर्ण करण्यात आली. काही माेजकीच कामे उरली आहे ती पुढील चार दिवसात होणार आहे. एमजी रस्ता, १८ जून रस्ऱ्यांच्या गटारांचे काम झालेली नाही ते पावसाळ्यानंतर होऊ शकते. यंदा पणजी बुडणार नाही हे सांगता येत नाही. गटाऱ्यांत पाणी साचत असल्याने पणजी बुडत असते. पण बहुतांश कामे आम्ही पूर्ण केली आहेत. स्मार्ट सिटीच्या कामाचा दर्जा चांगला नसला तर तो कंत्राटदार पाहणार आहे. पण लोकांना लवकर कामे करुन देणे व वेळेत देणे यासाठी आपचा प्रयत्न आहे. कंत्राटदार तसेच सर्व अधिकाऱ्यांना तसे आदेेश दिले आहे.
पणजी बसस्थानकाचा प्रस्ताव मांडणार
पणजी ही राजधानी असल्याने पणजीत नवीन व मोठा बसस्थानक असणे गरजेचे आहे. सध्याचा बसस्थानक जुना झाला असून तो गुरांची शेडी सारखा दिसत आहे. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडणार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्च करणार आहे. असेही मंत्री बाबूश म्हणाले.
कामगार कायद्यात दुरुस्ती करणार
ज्या खासगी कंपन्या सरकारच्या परवानगी शिवाय बाहेरील कामगार आणून कामगारांची भरती करतात त्यांना दंड घातला जाणार आहे. सध्या फक्त ५०० रुपये दंड आहेत तो वाढवीला जाणार. कंपन्यांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत. त्यांनी फक़्त कामगार कायद्याच्या नियमांचे पालन करावे पण काही कंपन्या करत नसल्याने यासाठी येत्या अधिवेशनात कामगार कायद्यात दुरुस्ती केली जाणार असेही मंत्री बाबूश म्हणाले.