वास्को: गस्तीवर असलेल्या वास्को पोलीसांना एक तरुण शांतीनगर महामार्गाच्या परिसरात संशयास्पद फीरत असल्याचे आढळून येताच त्याला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याशी गांजा अमली पदार्थ आढळून आला. बेकायदेशीररित्या बॅगेत गांजा अमली पदार्थ घेऊन फीरणाऱ्या खुदबुद्दीन अंन्सारी (वय ३०) याला पोलीसांनी त्वरित ताब्यात घेऊन अटक केली.
वास्को पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी (दि.३१) पहाटे २ वाजता खुदबुद्दीन याला अटक करण्यात आली. मंगळवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक विभा वळवईकर आणि वास्को पोलीस स्थानकावरील जवान शांतीनगर परिसरात गस्तीवर असताना त्यांना एक तरुण संशयास्पद फीरत असल्याचे आढळून आले. पोलीसांनी त्याला थांबवून तेथे फीरण्या मागचे कारण विचारले असता त्याला योग्य उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलीसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या खांद्यावर असलेल्या बॅगेत गांजा असल्याचे आढळून आले. पोलीसांनी त्याला त्वरित ताब्यात घेऊन वास्को पोलीस स्थानकावर आणून अटक केली. गांजासहीत रंगेहात पकडलेल्या तरुणाशी पोलीसांनी चौकशी केली असता त्याचे नाव खुदबुद्दीन असून तो उत्तरप्रदेश येथील असल्याचे उघड झाले.खुदबुद्दीन कडून पोलीसांनी ६८० ग्राम गांजा जप्त केला आहे. खुदबुद्दीन गांजा घेऊन कोणाला तरी विकण्यासाठी आला होता अशी माहीती चौकशीवेळी उघड झाली. त्याने गांजा कुठून आणला होता आणि तो कोणाला विकायला आला होता त्याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. ह्या वर्षात वास्को पोलीसांनी अमली पदार्थ घेऊन फीरणाऱ्यावर केलेली ही पहीली कारवाई असल्याची माहीती प्राप्त झाली. वास्को पोलीस त्या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.