नारायण गावस, पणजी-गोवा: अयोध्येत झालेल्या राम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना निमित्त राज्यातील सर्व मंदिरामध्ये दिपोत्सव, दिंडी, भजन महाआरती महाप्रसाद झाला. शहरापासून ग्रामीण भागात सर्व मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमही आयोजित केलेे होते. सर्व सुहासिनी महिलांनी पंचारत घेत मंदिरामध्ये प्रदक्षिणा घातले तसेच प्रत्येक मंदिरामध्ये श्रीरामाचे फोटाेपूजन केले अनेक लोकांनी यावेळी भगवे वस्त्र घातले होते.
राम नामाचा जप करत अनेक लाेकांनी ऐकमेकांना शुभेच्छा दिल्या गावागावात लाेकांनी एकत्र येत विविध धार्मिक कार्यक्रम केले. प्रत्येक गावातील लोकांनी श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापनाचे शुभकार्य झाल्यावर मंदिरामध्ये सांगणे केले. गावागावात तसेच शहरी भागात सर्वत्र वातावरण भक्तीमय झाले होते. सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने गावागावात माेठ्या प्रमाणात लाेकांनी उपस्थिती लावली होती.
मंत्री आमदारही सहभागी
समान्य लोकांप्रमाणे राज्यातील सर्व मंत्री आमदारांनी आपआपल्या मतदारसंघातील मंदिरामध्ये दिवसभर पूजा महाआरती केली. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी मंदिरामध्ये महाप्रसादही ग्रहण केला. गेले आठ दिवस राजकीय नेते तसेच लाेकांकडून मंदिरांची साफसफाई केली हाेती. त्यामुळे सर्वच मंदिरामध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
माेठ्या स्क्रीनवर थेट प्रेक्षपण
अनेक गावांतील मंदिरामध्ये लाेक श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना एकत्र बसून पहायला मिळावा यासाठी मंदिरामध्ये माेठ्या स्क्रीन बसविण्यात आले होते. या स्क्रीनवर वर लाेकांनी एकत्र श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा साेहळा पाहिला . अनेक मंदिरामध्ये लाेकांनी महाप्रसादाचे आयाेजन केले. त्याचाही लाेकांनी आस्वाद घातला.