फोंडा (गोवा) : धार्मिक भावना भडकावून व देश विरोधी कारवाया करण्यासंबंधी लोकांना प्रेरित करण्याचा संशयावरून मोहम्मद हनिफ अहरार (वय 42, राहणार नागा मस्जिद) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देशभरात आज मुस्लिम कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. त्यामध्ये मोहम्मद हनीफ चा समावेश आहे.
ताब्यात घेण्यात आलेला संशयित महम्मद हनीफ हा नागा मस्जिद येथे भाड्याच्या खोलीत राहत आहे. पूर्वी तो नागा मस्जिद येथील नुरानी मस्जिद मध्ये मौलाना म्हणून काम करायचा. व्यवस्थापन समितीने नंतर त्यांना त्या पदातून मुक्त केले होते. मौलाना पदातून मुक्त झाल्यानंतर मग मोहम्मद हनिफ हा ऑल इंडिया इमाम कौन्सिल चा सक्रिय सदस्य झाला होता. सदर संस्थेचे अध्यक्ष व सरचिटणीस पद सुद्धा त्याने सांभाळले आहे. भारतभर दौरे करून मुस्लिम धर्माचा प्रचार करायचा.व धार्मिक भावना बिघडण्यास पुढाकार घेतल्याचा संशय त्याच्यावर आहे. त्यासाठीच चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.