नारायण गावस ,पणजी: अयोध्येत २२ राेजी हाेणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनानिमित्त देशभर भक्तीमय वातावरण झाले आहे. आता भाजपसह इतर राजकीय काही आमदार आपल्या मतदारसंघात विविध कार्यक्रम राबवित आहेत. नुकतेच आरजी पक्षाचे नेते व सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील डोंगरी गावात लोकांसोबत १६ हजार पेणत्या पेटवून एक नवा उपक्रम केला. यात गावातील मोठ्या संख्येने लाेक उपस्थित होते.
प्रत्येक मंत्री आमदार आपआपल्या मतदारसंघात मंदिरे साफ करणे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच इतर काम सुरु आहे. आरजी हा भाजपचा विरोधक पक्ष असला तरी भाजप फक़्त राजकीय हेतूने याचा वापर करत आहे असा आरोप न करता स्वताही या उत्सहात सहभागी झाले आहेत. पण इतर काही पक्षाच्या नेत्यांनी याला राजकीय रंग दिल्याने या उत्सवात सहभागी दर्शवताना दिसत नाही. आरजीचे नेते आमदार विरेश बाेरकर यांनी १६ हजार पणत्या पेटवून आपल्या मतदारसंघातील डाेंगरी गावाचे नाव प्रसिद्ध केले आहे.
डोंगरी गावातील लोकांनी या १६ हजार मातीच्या पणत्या पेटवून श्रीरामाचे चित्र व नाव साकारले होते. बुधवारी रात्री डाेंगरी गावातील सर्व स्थानिकांनी या पणत्या पेटवत एक संदेश दिला. याला उपस्थिती लावून विरेश बाेरकर लोकांचे बनाबळ मोठे केले.श्रीराम हे आमचे सर्वांचे दैवत आहे. आम्ही आमच्या लोकांसमवेत आहोत. मतदारसंघातील लाेकांनी ही एक चांगली क्रिऐटीव्हटी तयार करुन गावाचे नाव मोठे केले आहे. सर्वांनी या भक्तीमय उत्सवात सहभागी होत गावागावात असे आनंदाचे उपक्रम तयार करावे असे आमदार विरेश बाेरकर यांनी सांगतिले.