शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात टेम्पो चालकाचे धुमशान; मद्यधुंद अवस्थेत नागरिकांना उडवलं, दोघे जखमी
2
IND vs BAN पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; सरफराज, जुरेल अन् यश दयालला संधी
3
"संजय राऊतला लाज वाटली पाहिजे", प्रवीण दरेकर का भडकले?
4
"माझ्या पराभवाचा आनंद व्यक्त करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा"; विनेशची मागणी
5
'शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध हवे आहेत, पण...', राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
6
नक्षलवादावर अखेरचा वार, केंद्राने आखली रणनिती; 4000 CRPF जवान निघाले निर्णायक लढाईला
7
गौतम अदानींचे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोठे नुकसान; पाच कंपन्यांमुळे ३१ हजार कोटींचा फटका
8
कोल्हापूरात लेसर लाईटमुळे दोघांच्या डोळ्यातून रक्तस्राव, एकाची दृष्टी मंदावली
9
भारत बनणार सेमीकंडक्टर हब; ₹ 2.36 लाख कोटींच्या गुंतवणुकीसह 6 प्लांट उभारले जाणार
10
"आता जगू शकत नाही", IAS ची तयारी करणाऱ्या तरुणाने 8व्या मजल्यावरून मारली उडी
11
अमित शहा आणि CM योगींच्या वादामुळे भाजपचे नुकसान? प्रशांत किशोर यांनी दिले उत्तर
12
"काँग्रेस सोड, नाहीतर...", बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी
13
पूजा खेडकर वादानंतर 30 पेक्षा जास्त अधिकारी रडारवर; UPSC ला मिळाल्या तक्रारी
14
ममता बॅनर्जींवर संताप अन् खासदारकीचा दिला राजीनामा! कोण आहेत जवाहर सरकार?
15
"विकास करूनही वेगळा निर्णय घेणार असाल तर, बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा"; अजित पवार थेटच बोलले
16
कन्नड पोलीस कॉलनीवर शोककळा; भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन मुलांचा मृत्यू
17
Monkeypox : भारतात आढळला मंकीपॉक्स संशयित रुग्ण, आरोग्य मंत्रालयाने काय दिली माहिती?
18
काय सांगता! घरावर नोटांचा पाऊस, पैसा पाहण्यासाठी लोकांची गर्दी, छतावर संदेशही लिहिला...
19
२००० रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर १० टक्के GST भरावा लागणार? उद्या होणार निर्णय
20
अन् Musheer Khan यानं खेळला चतुर-चपळाईचा डाव! असा दूर केला विजयातील अडथळा

गोव्यात राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याची मालिका

By किशोर कुबल | Published: July 09, 2024 2:48 PM

न्हयबाग, पोरस्कडे आणखी एक दरड कोसळली

किशोर कुबल/पणजी

पणजी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर न्हयबाग, पोरस्कडे येथे आज पहाटे आणखी एक दरड कोसळली. यामुळे जुन्या मार्गाने वाहतूक वळवावी लागली.

गेल्या आठ दिवसात या भागात दरडी कोसळण्याची मालिका सुरू असून मालपेंपासून काही अंतरावर आज पहाटे ही येथे दरड कोसळली. हा राष्ट्रीय महामार्ग नेहमीच व्यस्त असतो.  मुंबई-गोवा बसगाड्या पहाटेच गोव्यात पोहचत असतात. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. परंतु बगल रस्त्याच्या बाबतीत कंत्राटदाराने डोंगर फोडून केलेले निकृष्ट बांधकाम, यामुळे संताप पसरला आहे.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी गुरुवारी ११ रोजी गोव्यात येत आहेत. तसेच येत्या १५ जुलैपासून गोव्यात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने जोरदार टीका चालवली आहे.

कारवाई करा : काँग्रेसची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,' एम. व्ही. राव इन्फ्रा कंपनी या कंत्राटदाराला ताबडतोब अटक करून काळ्या यादी टाका. हा कंत्राटदार भाजपचा जावई बनला आहे. बगल रस्त्याच्या कामाच्या बाबतीत शरमजनक घोटाळा झालेला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी व्हायला हवी.'दरम्यान, दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने राज्यात ठीकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. कोने,प्रियोळ येथे दोन दिवसापूर्वी मोठी दरड कोसळली.

'भूस्खलनासाठी असुरक्षित'दरम्यान, राज्य भूस्खलनासाठी असुरक्षित होत आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. भूस्खलनाच्या अलीकडील संशोधनाने अशा नैसर्गिक आपत्तींबाबत, विशेषत: पावसाळ्यात राज्याची वाढती असुरक्षितता अधोरेखित केली आहे. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील संशोधकांनी केलेल्या सर्वसमावेशक अभ्यासात भूस्खलन-प्रवण क्षेत्रांचे बारा नवीन नकाशे तयार केले आहेत, ज्यांची पूर्वी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणातही नोंद झाली नव्हती

टॅग्स :goaगोवा