शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

काजूच्या बिया घेउन जाणारा ट्रक गोव्यात दरीत कोसळला; दोघांजणांचा मृत्यू, मुख्यमंत्री सावंतही हेही बचावकार्यात आले धावून

By सूरज.नाईकपवार | Published: March 17, 2024 4:05 PM

काजूच्या बियाघेउन महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे जाणारा एक ट्रक  गोव्यातील सासष्टीच्या कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत  घोडेव्हाळ येथे दरीत कोसळल्याने दोघाजणांचा दुदैवी मृत्यू झाला.

मडगाव: काजूच्या बियाघेउन महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे जाणारा एक ट्रक  गोव्यातील सासष्टीच्या कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत  घोडेव्हाळ येथे दरीत कोसळल्याने दोघाजणांचा दुदैवी मृत्यू झाला. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास अपघात घडला.याच वेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे काणकोण येथील आपला दौरा संपवून परत येत असताना त्यांना ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वताहून बचावकार्यालाही धावून येउन सहकार्य केले. तर त्यांच्यासोबत असलेले समाजकल्याण मंत्री तसेच भाजपाचे प्रदेश सरचिटणीस नरेद्र सावईकर यांनीही त्यांना याकामी मदत केली. मृत पावलेल्यांची नावे देवराज सातनी व हस्कु सातनी असे असल्याची माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली आहे. मयत सासरा व सून असल्याचेही पोलिसांनी सांगितले असून, त्यांच्या नात्याबाबत सदया पोलिस खातरजमा करीत आहेत. ते फुगे विक्रेते असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. गोमेकॅात इस्पितळात त्यांना मृत्यू आला.

या अपघात प्रकरणात पोलिसांनी सदया त्या ट्रकचा चालक राकेश गोरे याला ताब्यात घेतले आहे. तो मूळ महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील आहे. त्याला अटक केली जाईल अशी माहिती कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सदया उपनिरीक्षक कविता रावत या करीत आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेजारच्या कर्नाटक राज्यातील मंगळुरुहून एक इचर ट्रक काजूच्या गोणपटी घेउन महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे जात होता. त्या ट्रकमध्ये १२ जण अन्यही होते. त्यांना ट्रकच्या मागे बसविले होते. घोडेव्हाळ येथे पोहचल्यानंतर ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटला व त्याने सरळ कठडयाला धडक दिली व ट्रक खाईत पडला.

याचवेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे काणकोणहून आपला कार्यक्रम संपवून परत येत होते. त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी स्वता घटनास्थळी जाउन जखमींना मदतकार्यासाठी मदत केली. समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हेही तेथे हजर होते, त्यांनीही बचावकार्यात सहकार्य केले. त्यानंतर जखमींना मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले तेथे स्वता मंत्री फळदेसाई उपस्थित होते. ट्रक खाईत लोटल्यानंतर त्यावर असलेल्यांनी जीवांच्या आकांतानी मदतीसाठी आक्रोश केला. पाच लहान मुलेही होती. त्यांचा जीव घालमेल झाला होता. त्यांनी एकच हुंबरडा फोडला होता.

मुख्यमंत्री सावंत यांनी घटनास्थळी गेल्यानंतर मला सुरक्षा नको तुम्ही पहिल्यांदा जखमींना बाजूला काढा अशा सूचना देत रुग्णांना पहिल्यांदा इस्पितळात न्या असे सांगितले.