'अन्य राजकीय पक्षांमधील चांगल्या नेत्यांचे आम आदमी पक्षात स्वागतच'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 01:42 PM2020-03-03T13:42:48+5:302020-03-03T13:43:12+5:30

अन्य राजकीय पक्षांमधील चांगल्या नेत्यांना आम आदमी पक्ष स्वीकारण्यास तयार आहे असे विधान गोवा भेटीवर असलेल्या दिल्लीच्या आमदार आतिशी मार्लेना यांनी केलं.

AAP doors open for 'good people' from other parties: Atishi Marlena SSS | 'अन्य राजकीय पक्षांमधील चांगल्या नेत्यांचे आम आदमी पक्षात स्वागतच'

'अन्य राजकीय पक्षांमधील चांगल्या नेत्यांचे आम आदमी पक्षात स्वागतच'

googlenewsNext

पणजी - गोव्यात अन्य राजकीय पक्षांमधील चांगल्या नेत्यांना आम आदमी पक्ष स्वीकारण्यास तयार आहे, असे विधान गोवा भेटीवर असलेल्या दिल्लीच्या आमदार आतिशी मार्लेना यांनी केलं आहे. आतिशी या गोवा आपच्या प्रभारी आहेत. त्या म्हणाल्या की चांगली पार्श्वभूमी असलेले तसेच भ्रष्टाचार किंवा गुन्हेगारीचा कोणताही कलंक नसलेल्या निधर्मी नेत्यांचे अन्य पक्षामधून आमच्याकडे स्वागतच आहे. 2022 ची गोव्यातील विधानसभा निवडणूक आम्हाला जिंकायची आहे. गोव्यात काँग्रेस तसेच भाजपाला भक्कम पर्याय द्यायचा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. 

अन्य पक्षांच्या चांगल्या नेत्यांना आमचे दरवाजे कधीच बंद नाहीत. अन्य पक्षांमध्येही अनेक चांगले नेते आहेत हे नाकारून चालणार नाही. केवळ आम आदमी पक्षातच चांगले नेते आहेत, असे म्हणणे आगाऊपणा ठरेल. गोव्यातील अन्य राजकीय पक्षांमध्ये असे काही चांगले नेते आहे जे त्यांच्या पक्षाच्या संस्कृतीशी, ध्येयधोरणांशी संतुष्ट नाहीत. भ्रष्ट, गुन्हेगार व जातीयवादी नेत्यांना आम आदमी पक्षात स्थान नाही. जनतेचे विषय घेऊन लढणारे स्वच्छ चारित्र्याचे नेते आम्हाला हवे आहेत. 

2017 च्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव आमच्यासाठी धडा होता. तेव्हा आमचे तळागाळात संघटनात्मक काम नव्हते त्यामुळे ही स्थिती ओढवली. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने गोव्यात 40 पैकी 39 जागा लढविल्या होत्या आणि सर्व जगावर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. एवढ्या जागा त्यावेळी ही चूक होती असे वाटत नाही. कारण आम्हाला पक्ष लोकांपर्यंत पोहोचवायचा होता, असे त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

महाविकास आघाडीत पुन्हा मतभेद; मंत्री सांगतात एक, तर मुख्यमंत्र्यांचा वेगळाच दावा

Narendra Modi: भाजपा खासदारांच्या बैठकीत नरेंद्र मोदी भावूक; देशाबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...

मोदींनी सोशल मीडिया सोडू नये, अन्यथा...; संजय राऊत यांचा खोचक टोला

Narendra Modi : ...म्हणून मार्क झुकेरबर्ग यांनी मोदींसाठी बदलला होता आपला प्रोफाईल फोटो

Narendra Modi: 'या' कारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला?

 

Web Title: AAP doors open for 'good people' from other parties: Atishi Marlena SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.