शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

गोव्यात पोटनिवडणुकीतून ‘आप’ची माघार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 6:42 PM

गोव्याची राजधानी पणजी तसेच वाळपई विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने गुरुवारी जाहीर केला. या दोन्ही पोटनिवडणुका लढविणार असल्याचे पक्षाने यापूर्वी म्हटलेले होते.

पणजी, दि. 3 - गोव्याची राजधानी पणजी तसेच वाळपई विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने गुरुवारी जाहीर केला. या दोन्ही पोटनिवडणुका लढविणार असल्याचे पक्षाने यापूर्वी म्हटलेले होते.संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देऊन मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री होणे पसंत केले. त्यांच्यासाठी पणजीच्या आमदारकीचा सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी राजीनामा दिला. त्यामुळे पोटनिवडणूक होत आहे. माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंग राणे यांचे पुत्र विश्वजीत राणे यांनी काँग्रेसला रामराम करून भाजप सरकारमध्ये आरोग्यमंत्रिपद स्वीकारले. त्यामुळे वाळपई विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.आपने या दोन्ही मतदारसंघांतून माघार घेतल्याने आता तिरंगी लढती होईल, हे जवळपास निश्चित आहे. आम आदमी पक्षाने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या होत्या; पण त्यांचा एकही उमेदवार टिकाव धरू शकला नव्हता. निवडणुकीनंतर पक्षाचे काम थंडावले आहे. पर्रिकर यांच्या विरोधातील मते विभागली जाऊ नयेत, मतदारांचा गोंधळ उडू नये तसेच पर्रिकर यांची कोंडी व्हावी, असे आपने म्हटले आहे. जाहीर बोलण्याची ही भाषा असली तरी संघटनात्मक ताकद कमी असल्याने आपने निवडणुका लढविल्या असत्या तरी चित्र फारसे बदलले नसते, असे राजकीय जाणकारांना वाटते. पणजी मतदारसंघातून भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे राष्ट्रीय सरचिटणीस गिरीश चोडणकर लढत देतील. भाषा माध्यमाच्या मुद्द्यावरून भाजपशी पंगा घेतलेल्या गोवा सुरक्षा मंच पक्षाने पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनाच निवडणूक रिंगणात उतरविले आहे. पर्रिकर यांना बिनविरोध निवडून येण्याची संधी न देणे आणि निवडणुकीच्या माध्यमातून पर्रिकर यांच्यावर भाषा माध्यमाचा प्रश्न सोडविण्यासाठी दबाव टाकण्याची खेळी गोवा सुरक्षा मंच खेळण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना त्यांना साथ देण्याची शक्यता आहे.