नारायण गावस
पणजी: गोवा विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणूक दि. १० जानेवारी २०२४ रोजी पार पडली. या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठातील ९ पैकी ८ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. गोवा विद्यापीठाच्या अध्यक्ष व सचिव पदावर अनुक्रमे अक्षय शेट व सुदीप नाईक विजयी झाले आहेत. तसेच सदस्यपदी मंदार देसाई, शुभम मळीक, आकाश नाईक, सुबेश नाईक गांवकर, प्रभा नाईक आणि मयंक प्रभुदेसाई विजयी झाले आहेत.
नवनिर्वाचित अध्यक्ष अक्षय शेट शिरोडा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. अभाविप चे दक्षिण गोवा जिल्हा संयोजक आहेत. २०१९ पासून अभाविपच्या कामात आहेत. काणकोण शहरमंत्री, दक्षिण गोवा जिल्हा सहसंयोजक अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.
नवनिर्वाचित सचिव सुदीप नाईक साखळी येथील सरकारी महाविद्यालयात गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. अभाविप उत्तर गोवा जिल्हा संयोजक आहेत. २०१८ पासून अभाविप च्या कामात आहेत. उत्तर गोवा जिल्हा महाविद्यालय प्रमुख अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अभाविप च्या विजयाबद्दल राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल, कोंकण प्रदेश अध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.
अभाविप कोंकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले की "गोवा विद्यापीठ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विजय ऐतिहासिक आहे. गोव्यातील विद्यार्थी हे राष्ट्रीय विचाराच्या सोबत आहेत. गोव्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभाविप कार्यकर्ते सदैव प्रयत्नशील असतील