नारायण गावस -पणजी: अनेक वर्षापासून कंदबा महामंडळाचे कर्मचारी सरकारकडे आपल्या विविध मागण्या मान्य करण्याची मागणी करत आहे. सातवा वेतन लागू करणे, ३४ महिन्यांची थकबाकी असे अनेक विषय आहेत. आता सरकारला हे कामगार शेवटचे इशारा देत आहे. जर सरकारने या मागण्या त्वरीत मान्य केल्या नाही तर कंदबा महामंडळाचे कर्मचारी राज्यभर काम बंद आंदोलन करणार आहे, असे आवाहन आयटकचे संयोजक कामगार नेेते ॲड. ख्रिस्तोफर फोन्सेको यांनी पणजीत आयाेजित केलेल्या पत्रकार परिषद केले.
कदंबा महामंडळाचे कर्मचारी गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करत आहे. आपल्या मागण्यासाठी वेळाेवेळी आंदोलन केली पण सरकारने काहीच दखल घेतली नाही. कदंबा महामंडळ महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे. जर या कामगारांनी संप केला तर याचा सर्वंना फटका बसणार आहे. सरकारतर्फे एस्मा लागु केला तरीही कर्मचारी संपावर जाणार आहे. याची दखल सरकारने घ्यावी. या कर्मचाऱ्यांचा वापर प्रत्येक सरकारी कामासाठी केला जातो. पण त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जाते.
कंदंबा महामंडळात ३० वर्षे सेवा करुनही निवृत्त झाल्यावर या कामगारांना २ ते २.५ हजार रुपये पेन्शन दिले जाते. तर महामंडळातील बदली कामगारांना फक्त १८ हजार पगार दिला जात आहे. ही एक प्रकारे सरकारकडून छळवणूक आहे .या कामगारांनी आपल्या कुटुंबाचे पालन कसे करावे, असेही ख्रिस्तोफर फोन्सेका म्हणाले.
सरकारने गेल्या आठ वर्षात फक्त १०० रुपये किमान वेतनात वाढ केली आहे. अकुशल कामगारांना प्रतिदीन फक्त ५०० रुपये पगार दिला जातो. राज्यात महागाई मात्र भरमसाठ वाढली आहे. यात ते आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करणार आहे. त्यामुळे किमान वेतन हे ८५० रुपये होणे गरजेचे आहे असेही खिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितले.