मडगाव : गोव्यातील दक्षिण गोव्यातील शेळवण कुडचडे येथील सुर्यकांत देसाई मृत्यू प्रकरणात आज मंगळवारी न्यायालयाने शेवंती देसाई व तिचा मुलगा हेमंत देसाई या दोघांना सदोष मनुष्यवधाखाली दोषी ठरविले. दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष पूजा कवळेकर यांच्या न्यायालयाने वरील निवाडा दिला. आरोपींच्या शिक्षेवर आता पुढील सुनावणीच्या वेळी युक्तीवाद होईल. पुढील सुनावणी गुरुवार दि. २४ रोजी होणार आहे. २३ फेब्रुवारी २०१५ रोजी खुनाची वरील घटना घडली होती. मयत व आरोपीमंध्ये जमिनीच्या हक्कावरुन वाद होता. सरंक्षण कठड्यावरुन भांंडण झाले होते. यावेळी शेवंती हिने सुर्यकांतला ढकलून दिले होते. तर हेमंत याने त्याच्यावर फवाडयाने वार केले होते. यात जखमी होउन मागाहून त्याला मरण आले होते.
कुडचडे पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रवी देसाई यांनी या प्रकरणाचा तपास लावताना संशयितांना अटक केली होती. नंतर त्या दोघांची जामिनावर सुटका झाली होती. सरकारपक्षातर्फे वकील शिल्पा नागवेकर यांनी युक्तीवाद केले. तर आरोपींच्यावतीने वकील ब्रुस फर्नांडीस यांनी बाजू मांडली.