शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या मडगावातील हॉटेल्सवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 7:04 PM

मडगाव मुख्याधिकाऱ्यांचा इशारा : धडक पहाणी मोहिमेत 15 पेक्षा जास्त हॉटेलात सापडला संमिश्र कचरा

मडगाव: गोव्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मडगावातील बहुतेक हॉटेल्स कच:याचे वर्गीकरण न करताच त्याची विल्हेवाट लावतात. यामुळे शहरातील कच:याच्या व्यवस्थापनावर ताण आला आहे. या परिस्थितीत हॉटेल्सनी या पुढे ओला व सुका कचरा वेगळा करुन ठेवला नाही तर त्या हॉटेल्सना सील ठोकण्याचा इशारा मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी दिला आहे.

मडगाव शहरात  दर दिवशी सुमारे शंभर टन कचरा निर्माण होतो. मात्र तो संमिश्र स्वरुपात गोळा केला जातो. यामुळे या कच:यावर प्रक्रिया करताना अडचणी निर्माण होतात. पालिकेकडून वर्गीकृत केलेला कचरा दिला जात नाही म्हणून शहरातील कच:यावर प्रक्रिया करणा:या कंपनीने यापुढे असा कचरा आल्यास आम्ही त्यावर प्रक्रिया करणार नाही असा इशाराही दिला होता. 

या पाश्र्र्वभूमीवर मंगळवारी पालिका मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी शहरातील हॉटेलाच्या कच:याची पहाणी केली असता अजुनही संमिश्र स्वरुपातच तो एकत्र करुन ठेवला जातो हे सिद्ध झाले. एका बाजूने मडगावातील रहिवाशांवर कच:याचे वर्गीकरण करण्याची सक्ती केली जात असताना दुस:याबाजूने सर्वात जास्त प्रमाणात कचरा निर्माण करणा:या हॉटेलांकडे मात्र मडगाव पालिकेकडून दुर्लक्ष होते याबद्दल मडगावच्या श्ॉडो कौन्सिलने कानपिचक्या दिल्यानंतर मडगाव पालिकेने त्वरित हालचाल करीत शहरातील हॉटेलांच्या कच:याची पहाणी केली. मडगावातील हॉटेलांनी आपल्या कच:याचे वर्गीकरण करुनच तो सफाई कामगारांकडे द्यावा अशी ताकीद हॉटेल चालकांना देण्यात आली असून यात हयगय केल्यास हॉटेलांना सील ठोकू असा इशारा मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी दिला.

मडगावातील काही मोठय़ा हॉटेल्ससह सुमारे 15 हॉटेल्सच्या कच:याची मडगाव पालिकेच्या पथकाने पहाणी केली असता, या सर्व हॉटेलांतून वर्गीकृत केलेला कचरा येण्याऐवजी सरमिसळ असलेला कचरा दिला जातो हे लक्षात आल्यानंतर नाईक यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. मडगावातील हॉटेलांनी ओला व सुका कचरा वेगळा करुन ठेवावा. सुका कचरा केवळ मंगळवार व शुक्रवारी उचलण्यात येणार असून ओल्या कच:याची उचल दररोज केली जाईल असे त्यांनी सांगितले.सिद्धिविनायक नाईक यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्य अभियंते मनोज आर्सेकर, व कनिष्ठ अभियंते मिष्कीता व इतरांनी मंगळवारी ही पहाणी केली. ही तपासणी मोहीम यापुढेही चालू राहील असे नाईक यांनी सांगितले. मडगावात 100 किलोपेक्षा अधिक कचरा तयार करणा:या आस्थापनांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत असे नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्याधिका:यांनी हाती घेतलेल्या या मोहीमेबद्दल शॅडो कौन्सिलने त्यांचे अभिनंदन केले असून आम्ही केलेल्या सुचनांची नाईक यांनी त्वरित दखल घेतली असे शॅडो कौन्सिलचे सावियो कुतिन्हो यांनी सांगितले. हॉटेलातील कच:याच्या संदर्भात पालिकेने कडक धोरण स्वीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.मडगावातील हॉटेलातून दर दिवशी 5 ते 8 टन कचरा निर्माण होतो. या कच:याचे व्यवस्थित वर्गीकरण न केल्यास शहराचे संपूर्ण कचरा व्यवस्थापन कोलमडून पडू शकते याकडेही त्यांनी लक्ष वेधले.