लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा: वाड्यावरील कार्यकर्ते हीच पक्षाची शक्ती केंद्र आहेत, असे मत सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी बुथ सशक्तीकरण अभियानाच्या पहिल्या बैठकीत मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, बूथ सशक्तीकरण अभियानाद्वारे विविध विषयांवर चर्चा केली जाते, प्रत्येक घरातील व्यक्तीची चौकशी व समस्या समजून घेण्यासाठी अभियान उपयुक्त ठरत आहे. सरकारी योजना व विकासकामे यावर विचारविनिमयही करण्यात येतो.
यावेळी व्यासपीठावर शिरोडा मतदारसंघ भाजप मंडळ अध्यक्ष सूरज नाईक, सचिव अवधूत नाईक, उपसरपंच सुनील नाईक, पंच सुहास नाईक, जिल्हा सचिव डॉ. गौरी शिरोडकर उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत बूथ अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. अध्यक्ष सूरज नाईक यांनी स्वागत केले व अभियानाचे महत्त्व सांगितले. अवधूत नाईक यांनी पक्षाच्या पुढील कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी डॉ. गौरी शिरोडकर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला युवक- युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"