लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : नाताळनिमित्त मुंबई ते थिवी, पुणे ते करमळी, करमळी पनवेल या मार्गावर अतिरिक्त रेल्वेगाड्या धावणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थिवी व परत या मार्गावर गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२ ही ११ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत धावणार आहे. मुंबईहून मध्यरात्री १२:२० वाजता सुटून ही रेल्वे दुपारी २ वाजता थिवी येथे पोहोचेल. तर परतीची गाडी दुपारी ३ वाजता निघून पहाटे ३:५० वाजता मुंबईला पोहोचणार आहे.
पेडणे, सावंतवाडी रोड, कुडाळ सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, ठाणे व दादर येथे ही रेल्वे थांबा घेईल.
पुणे जंक्शन करमळी व परत पुणे या मार्गावर २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत गाडी क्रमांक ०१४४५/०१४४६ ही रेल्वे धावणार आहे. दर शुक्रवार सायंकाळी ५:३० वाजता पुणे येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता करमळी येथे पोहोचेल.
तर करमळी येथून निघणारी गाडी सकाळी ९:२० वाजता सुटेल व त्याच दिवशी रात्री ११:३५ वाजता पुणे येथे पोहोचेल. थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, कल्याण, लोणावळा येथे थांबा घेईल.
करमळी ते पनवेल मार्गावर २३ डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान रेल्वेगाडी क्रमांक ०१४४८ / ०१४४७ ही धावणार आहे. करमळी येथून दर शनिवारी सकाळी ९:२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ८:१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल, तर पनवेल येथून दर शनिवारी रात्री १० वाजता सुटून सकाळी ८:३० वाजता करमळी येथे रेल्वे पोहोचणार आहे. थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड व रोहा येथे ही गाडी थांबा घेईल, अशी माहिती देण्यात आली.