नारायण गावस,पणजी: आदिवासी कल्याण खाते व उटा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ डिसेंबर राेजी पाचवे आदिवासी विद्यार्थी संमेलन हाेणार आहे. हे संमेलन वेर्णा येथील महालसा सभागृहात हाेणार आहे. या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती असणार, अशी माहिती उटाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश वेळीप यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्या सोबत आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर उपसंचालक विरा नाईक उपस्थित होत्या.
आदिवासी कल्याण खाते व उटा संघटना या उटाचे कार्यकर्ते मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांच्या स्मणार्थ २५ मे प्रेरणा दिवस साजरा केला जातो. त्याचाच भाग म्हणून हे विद्यार्थी संमेलन आहे. यात एसटी समाजाच्या गोवा शालांत मंडळात प्रथम ५ आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार हाेणार आहे त्यांना २० हजार व प्रमाणपत्र देण्यात ेयेईल. तसेच नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आदिवासी समाजाच्या खेळाडूंना मेडल मिळाले त्यांचाही सत्कार होणार असून त्यांना २० हजार व प्रमाणपत्र दिले जाणार आहे, असे प्रकाश वेळीप यांनी सांगितले.
या विद्यार्थी संमेलनाला ८ हजार राज्यभरातून विद्यार्थ्याची उपस्थिती लाभणार आहे. त्यांना केंद्रीय माहिती आयाेगाचे आयुक्त सुरेश चंद्रा मार्गदर्शन करणार आहे. तसेच आहात फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली पाठणकर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मंत्री गाेविंद गावडे, मंत्री एलेक्स सिक्वेरा, आमदार गणेश गावकर, आमदार ॲथनी वाझ, एसटी एससी आयाेगाचे अध्यक्ष दिपक करमलकर, आदिवासी कल्याण खात्याचे सचिव सरप्रीत सिंग गील, एसटी फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव गांवकर व उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप व आदिवासी खात्याचे संचालक दशरथ रेडकर उपस्थित असणार आहे.