पणजी : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक सोहळ्य़ांमध्ये भाग घेणो टाळावे, सोहळ्य़ांचे आयोजन शक्य तो पुढेच ढकलावे, असा सल्ला केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रलयाने दिला आहे. यामुळे गोव्यातील शिगमोत्सव मिरवणुकीच्या आयोजनावरही अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत शुक्रवारी व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. प्रत्येकाने आरोग्याविषयीची काळजी घ्यावी. सामुहिक पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करू नयेत व जर आयोजित केले तर राज्य सरकारने त्या कार्यक्रमातील लोकांना स्वच्छतेविषयी व कोरोना संसर्गासंबंधी काळजी घ्यावी, असे सल्ले केंद्रीय आरोग्य मंत्रलयाने दिले आहेत.आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी या पाश्र्वभूमीवर येथे पत्रकार परिषद घेतली. शिगमोत्सवाचे काय होईल असे पत्रकारांनी विचारले असता, मंत्री राणो म्हणाले की गोमंतकीय हुशार आहेत. त्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेणो कळते. सध्या काहीच महत्त्वाचे नाही तर प्रत्येकासाठी फक्त आरोग्यच महत्त्वाचे आहे हे गोमंतकीयांनाही ठाऊक आहे. त्यामुळे शिगमोत्सवाच्या मिरवणुका पुढे ढकलाव्यात की रद्द कराव्यात ते आपण सांगत नाही, पण केंद्राने दिलेल्या सल्ल्याची माहिती आपण सर्वार्पयत पोहचवत आहे. कोरोनासंबंधी स्थिती हाताळणो हे आव्हान आहे, असे मंत्री राणो म्हणाले.मंत्री राणो म्हणाले, की कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवरही परिणाम होणार आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे येणो-जाणो चाळीस ते पन्नास टक्क्यांनी घटले आहे. आखातात व अन्य विदेशात जे गोमंतकीय नोकरी करतात त्यांचीही अडचण झाली आहे. कारण अनेक गोमंतकीय सुट्टीवर गोव्यात आले होते. ते आता परत जाऊ इच्छीतात पण त्यांना विदेशात परतण्यात अडचण आली आहे. विशेषत: कुवेतमधील आपल्या नोकरीवर पुन्हा रूजू होणो गोमंतकीयांसाठी अडचणीचे बनले आहे. आमच्याशी असे गोमंतकीय संपर्क साधत आहेत. मी केंद्रीय आरोग्य मंत्रलयाला याविषयी उद्या लिहीन आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रलयाला याविषयी माहिती देण्यास सांगेन.
सार्वजनिक सोहळे टाळण्याचा सल्ला, शिगम्यावरही कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 6:41 PM