'गांजानंतर आता गोव्यात सरकार पुरस्कृत आत्मनिर्भर मटका'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 07:51 PM2020-12-29T19:51:54+5:302020-12-29T19:53:00+5:30

विजय सरदेसाई यांचा घणाघाती आरोप: मुख्यमंत्र्याबरोबर बैठकही झाल्याचा दावा

After cannabis, now there is a government sponsored self-reliant pot in Goa | 'गांजानंतर आता गोव्यात सरकार पुरस्कृत आत्मनिर्भर मटका'

'गांजानंतर आता गोव्यात सरकार पुरस्कृत आत्मनिर्भर मटका'

Next
ठळक मुद्देसोमवारी सरदेसाई यांनी भाजप सरकारने गोव्यात गांजाची लागवड अधिकृतपणे सुरू करण्यासाठीच्या प्रस्तावाची फाईल पुढे केल्याचा आरोप केला होता.

मडगाव : गोव्याला विकृतीच्या दृष्टीने आत्मनिर्भर करू पाहणाऱ्या प्रमोद सावंत यांच्या सरकारने आत्मनिर्भर गांजाबरोबर आता नव्या वर्षी नवा आत्मनिर्भर मटकाही आणण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण केले आहेत असा घणाघाती आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. औषधी वापराच्या नावावर गोव्यात गांजाची लागवड अधिकृतरित्या करण्यासाठी प्रस्ताव ठेवणारे प्रमोद सावंत यांचे भाजप सरकार आता नवीन वर्षी गोव्यात नवीन मटका सुरू करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप सरदेसाई यांनी मंगळवारी आपल्या एका व्हिडीओ संदेशातून केला. हा नवीन मटका सुरू करणाऱ्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री सावंत यांच्या बरोबर त्या व्यावसायिकांची बैठकही झाली आहे. गोव्यात सध्या चालू असलेला मटका पूर्णपणे बंद करून हा नवीन मटका हे सरकार आणू पाहत आहे. त्याचाच परिणाम म्हणून उत्तर गोव्यातील सद्याच्या मटका बंद केला आहे. दक्षिण गोव्यात जरी तो चालू असला तरी लवकरच तोही बंद होऊन हा सरकार पुरस्कृत मटका सुरू होणार आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

सोमवारी सरदेसाई यांनी भाजप सरकारने गोव्यात गांजाची लागवड अधिकृतपणे सुरू करण्यासाठीच्या प्रस्तावाची फाईल पुढे केल्याचा आरोप केला होता. मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अशी फाईल जरी पुढे आणली असली तरी अजून तो निर्णय घेण्यात आलेला नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. त्याबद्दल बोलताना सरदेसाई म्हणाले, या स्पष्टीकरणाने सरकारने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. कर्करोगावर औषध म्हणून ही लागवड केली जाणार असे सरकारचे म्हणणे असले तरी उत्पादित झालेला गांजा अमली पधार्थाचे सेवन करण्यासाठी वापरला जाणार नाही याची हमी सरकार कशी देऊ शकते असा सवाल त्यांनी केला. भाजपने गोवा विकायला काढला आहे. सरकारचा कारभार पाहिल्यास त्यांना गोवा हे विकृतीचे केंद्र बनविण्याचे आहे. गोवा हे व्यसनांचे केंद्रस्थान आम्हाला बनवू द्यायचे नसल्यास आता या सरकारचे हे असले इरादे नेस्तनाबूत करण्यासाठी 'टीम गोवा' या संकल्पनेखाली सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सरकारला अडविण्यासाठी दक्ष विरिधकांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या ' सेव्ह गोवा नाऊ' या संकल्पनेचा उल्लेख करताना गोवा वाचविण्यासाठी आम्हाला आताच प्रयत्न करावे लागतील अन्यथा वेळ हातची निघून जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

दक्ष गोवेकरांमुळेच गोवा सरकारला ओल्ड गोवा हा परिसर पीडीए क्षेत्रात आणण्याच्या निर्णयापासून दूर जावे लागले होते याचा उल्लेख करून गोवा पुढच्या पिढीला वाचवून ठेवायचा असेल मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन या सरकारला विरोध करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जाणार असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. त्याबद्दल बोलताना सरदेसाई म्हणाले, केवळ मी हा मुद्दा उपस्थित केला आहे म्हणून मला विरोध करण्यासाठी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा मुख्यमंत्री सावंत यांनी हट्ट धरू नये. अजूनही कोविडची भीती गेलेली नाही. ब्रिटन मधून आलेल्या लोकांच्या ज्या चाचण्या घेतल्या गेल्या त्यांचे अहवाल अजून आलेले नाहीत. ते झटपट मिळावेत यासाठी सरकारकडे कसलीही यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत ऑनलाईन परीक्षा घेणे हाच एकमेव पर्याय आहे. जर सरकारने आपला हट्ट न सोडून विद्यार्थ्यांचा जीव जर धोक्यात घातला तर या सरकारला धडा शिकविण्यासाठी हे विद्यार्थीच पुढे येतील हे लक्षात ठेवावे असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: After cannabis, now there is a government sponsored self-reliant pot in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.