पणजी : मान्सूननंतर राज्यात केवळ १0 खाणी सुरू झालेल्या आहेत. खनिज उत्खननही अत्यंत धिम्या गतीने चालू आहे. ८९ खाण लिजांपैकी केवळ १0 सुरु होऊ शकल्या. खाण खात्याच्या वरिष्ठ अधिका-यांनी यास दुजोरा दिला. गेल्या १ तारखेपासून खाण मोसम सुरू झाला, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गोव्याच्या कमी ग्रेडच्या खनिजाला दर मिळत नाही.शिवाय खाण व्यावसायिकांसमोर अन्य स्थानिक प्रश्नही आहेत. त्यामुळे हा व्यवसाय गती घेऊ शकलेला नाही. ज्या १0 खाणी सुरू झाल्या, त्यांनी आजपावेतो 0.८३९ दशलक्ष टन इतके उत्खनन केल्याचे सांगण्यात आले. येत्या काही दिवसांत या व्यवसायाला गती प्राप्त होणार आहे. नैर्ऋत्य मान्सून सुरू झाल्यानंतर चार महिने खाणी बंदच असतात. त्या साधारणपणे आॅक्टोबरमध्ये सुरू होतात. यंदा त्या थोड्या विलंबाने सुरू झालेल्या आहेत. परंतु पूर्ण वेग मिळालेला नाही. ट्रकमालकांना खनिज वाहतूक दर वाढवून देण्याच्या प्रश्नावर केलेले आंदोलन हेही एक कारण आहे. वेदांता व फोमेंतो कंपन्यांनी उत्खनन सुरू केले आहे.वर्षाकाठी २0 दशलक्ष टन खनिज उत्खनन मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आहे. चालू आर्थिक वर्षात ५.५२ दशलक्ष टन उत्खनन आजपावेतो झालेले आहे. मान्सूनपूर्वी ४.६९ दशलक्ष टन उत्खनन झाले होते. त्यावेळी ४0 खाण लिजेस कार्यरत होत्या. मान्सूननंतर प्रत्येक खाणीने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कन्सेंट टू आॅपरेट परवाने घेणे बंधनकारक आहे. २0१६-१७ या गेल्या आर्थिक वर्षात ४६ खाणींनी २0 दशलक्ष टन उत्खनन केले.१२ खाणींना नोटिसादरम्यान, १९९४ च्या अधिसूचनेप्रमाणे पर्यावरणीय परवाने (ईसी)असलेल्या १२ खाणींना परवाने रद्द का केले जाऊ नयेत, अशी विचारणा करणा-या कारणे दाखवा नोटिसा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावल्या असून सात दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे. मंडळाच्या अधिकाºयांनी यास दुजोरा दिला.
मान्सूननंतर गोव्यात केवळ 10 खाणी सुरू, खनिजाला आंतरराष्ट्रीय बाजारात दर नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 6:34 PM