पणजी - गोवा कोंकणी अकादमीला अखेर 1 वर्ष आणि 9 महिन्यांच्या खंडानंतर डॉ. सुरेश आमोणकर यांच्या रुपाने सरकारने नवे अध्यक्ष दिले. यामुळे मंगळवारपासून कोंकणी अकादमी एका अर्थाने पुनरुज्जीवित झाली.
कोंकणी अकादमीच्या अध्यक्षपदाचा ज्येष्ठ कवी माधव बोरकर यांनी 11 एप्रिल 2क्17 रोजी राजीनामा दिला होता. अकादमीचे काम पुढे नेण्यासाठी सरकारकडून वेळेत निधी मिळत नाही, कार्यक्रमांचे प्रस्ताव मंजुर होण्याबाबत पुरेसे सहकार्य मिळत नाही व त्यामुळे बोरकर यांनी अध्यक्षपद सोडले, अशी प्रतिक्रिया त्यावेळी कोंकणीप्रेमींमध्ये व्यक्त झाली होती. गेले दीड वर्ष अकादमीला अध्यक्ष नसल्याने कोंकणीप्रेमींमध्ये नाराजी होती. सरकारच्या राजभाषा संचालनालयाने मंगळवारी ज्येष्ठ लेखक पद्मश्री डॉ. आमोणकर यांची अकादमीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करणारी अधिसूचना जारी केली. कोंकणी अकादमीवर कांता गावडे(वेलिंग म्हादरेळ), अरुण साखरदांडे (म्हापसा) व आग्नेल डिसिल्वा (साखळी) यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
आमोणकर यांनी मंगळवारी सायंकाळी अकादमीत येऊन अध्यक्षपदाचा ताबा स्वीकारला. लोकमतशी बोलताना आमोणकर म्हणाले, की दीड वर्ष अकादमीवर अध्यक्ष नव्हता व त्यामुळे अध्यक्ष नसणो म्हणजे अकादमीला मार्गदर्शन सुद्धा नव्हते ्असा अर्थ होतो. अकादमीतील अधिका:यांसोबत आपल्याला अगोदर चर्चा करावी लागेल. पदाधिका:यांनी बोलावे लागेल. अध्यक्ष नसलेल्या कुठल्याही संस्थेला नवी दिशा द्यावी लागते.
आमोणकर यांनी ताबा स्वीकारल्यानंतर अकादमीच्या सचिव उपासना माजगावकर व अन्य अधिका:यांशी चर्चा केली. अकादमीच्या बहुतेक योजना सुरू असल्याचे व अंमलात असल्याचे त्यांना आढळून आले. फक्त अकादमीचे पुरस्कार व युवा साहित्य संमेलन काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहे. त्याची कार्यवाही लवकरच होईल, असे आमोणकर म्हणाले.