पणजी: येत्या लोकसभा निवडणूका लढविण्याचा निर्णय आरजीपीने घेतल्या नंतर आता प्रचारात जाेर धरण्याचे काम हाती घेतले आहे. लाेकसभेच्या निवडणूकांना आता काहीच दिवस शिल्लक राहिल्याने राज्यातील तळागाळातील लाेकांपर्यंत पाेहोचण्यासाठी प्रचावर भर देणार असल्याचे सांतआंद्रेचे आमदार व आरजीपीचे नेते विरेश बाेरकर यांनी सांगितले.
सध्या सर्व तालुकापातळीवर आरजीपीची बैठक घेतली जात आहे. तालुका तसेच गटसमितीचे सर्व कार्यकर्ते आमच्या संपर्कात असून येत्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची तयारी केली जात आहे. येत्या लोकसभेच्या निवडणूकीत सरकारचे अपयश आम्ही जनतेला दाखवून देणार आहोत. गेल्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपने कशी लाेकांची फसवणूक केली आहे हे आम्ही लाेकांना पटवून देणार आहोत. लोकांनाही आता बदल पाहिजे आहे. लाेक
आमदार विरेश बोरकर म्हणाले, भाजपने गोव्यात सुर केलेले स्थानिकांच्या विरोधातील कामे लोकांना सांगणार तोच वाढती बेराेजगारी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार तसेच जामिनींची कशी बेकायदेशीर विक्री केली जाता हे लोकांना प्रचाराच्या माध्यमातून ज सागणार आहोत. भाजप कशी जातीयवादावर मते मिळवितात या विषयी लाेकांना समजावून सांगितले जाणार आहे.
भाजप फक्त विकासाची नावाने मते मागत आहेत. पण या विकासाचा स्थानिकांना काहीच फायदा झालेला नाही. बेराेजगारी वाढली आहे. बेराेजगारांना बेकारी भत्ता दिला जाणार म्हणून आश्वासन दिले त्याची फसवणूक केली. विकासाच्या नावाखाली लाेकांच्या शेतजमिनी विकल्या. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे माेडले आहे. आम्ही हे सर्व विषय घेऊनचे निवडणूकीत भाजप विरोधी प्रचार करणार असे आमदार विरेश बोरकर म्हणाले.