शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

विधानसभा निवडणुका साडेतीन वर्षानंतरच; भाजपचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:05 PM

मंत्रिमंडळ विस्ताराच्या विषयावरून कार्यकर्त्यांनी त्यांची मते व्यक्त केली तरी, आम्ही चर्चा करून कार्यकर्त्यांना विषय पटवून दिला व त्यामुळे वाद मिटला असा दावा तेंडुलकर यांनी केला.

पणजी : गोवा विधानसभा निवडणुका येत्या लोकसभा निवडणुकीसोबत घेण्याचा मुळीच विचार नाही. विद्यमान सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करील. येत्या साडेतीन वर्षानंतरच मग विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शनिवारी येथे सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या विषयावरून कार्यकर्त्यांनी त्यांची मते व्यक्त केली तरी, आम्ही चर्चा करून कार्यकर्त्यांना विषय पटवून दिला व त्यामुळे वाद मिटला असा दावा तेंडुलकर यांनी केला.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी पर्वरी येथे पार पडली. त्यानंतर तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर व सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी पणजीत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भाजप कार्यकर्त्यांमधील व काही आमदारांमधील असंतोषाविषयी पत्रकारांनी विचारताच तेंडुलकर म्हणाले, की कार्यकर्त्यांना आपण भेटलो. त्यांचे म्हणणे ऐकले व मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय त्यांना पटवून दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील वाद आता मिटला. लोकसभा निवडणुकीवर गोव्यात त्याचा काही परिणाम होणार नाही. 

मुख्यमंत्री पर्रीकर व आमदार पांडुरंग मडकईकर हे कधी परत येतील, असे पत्रकारांनी विचारताच तेंडुलकर म्हणाले की पर्रीकर परत येतील पण ते केव्हा येतील याची कल्पना नाही. मडकईकर यांची प्रकृती सुधारली आहे पण ते लगेच चालत रोज सचिवालयात येऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याऐवजी निलेश काब्राल यांच्याकडे वीज खाते सोपवावे लागले. काब्राल यांना मंत्री करावे लागले. वीजेचे प्रश्न तातडीने सोडवावे लागतात. काब्राल ते काम करतील. फोंडय़ातील वादळानंतरही त्यांनी जलदगतीने काम केले. मडकईकरांचे आरोग्य पूर्ण सुधारल्यानंतर व ते पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांच्याविषयी मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील. 

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती राज्य कार्यकारिणी बैठकीत देण्यात आली. महात्मा गांधी जयंतीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याने भाजपकडून देशभर येत्या दि. 2 ऑक्टोबरपासून दि. 3 जानेवारीपर्यंत पदयात्रा काढली जाईल. गांधीजींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश व त्यांचा वारसा सर्वत्र पोहचविला जाईल. निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून गोव्यात पक्षाचे काम वाढविणे, बूथस्तरापासून संघटना मजबूत करणे हे सगळे सुरू आहे, असे खासदार सावईकर यांनी सांगितले.

दोन तासांत बैठक आटोपलीदरम्यान, भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक ही पूर्वी एक दिवसाची होत असे. नंतर ती अर्ध्या दिवसाची होऊ लागली. शनिवारी फक्त दोन तासांत कार्यकारिणी बैठक आटोपली. प्रत्येक राज्य कार्यकारिणी बैठकीत राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेऊन सरकारने केलेल्या प्रगतीविषयी अभिनंदन करण्याचा ठराव संमत करून घेतला जात असे. मात्र, शनिवारच्या बैठकीत तसा कोणताच ठराव घेतला गेला नाही, असे बैठकीस उपस्थित राहिलेल्या काही सदस्यांनी लोकमतला सांगितले. पर्रीकर यांना एनआयटीने डिलीट पदवी दिल्यामुळे पर्रीकर यांचे अभिनंदन करणारा ठराव तेवढा घेतला गेला. तसेच सर्जिकल स्ट्राईकविषयी पंतप्रधानांच्या निर्णयाचे अभिनंदन केले गेले.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकर