म्हापसा : गोव्याची कृषी संपन्नता दर्शवणारे शेतकºयांनी घेतलेल्या कष्टाची माहिती देणारे गोवा कृषी क्रांती प्रदर्शन उत्तर गोव्यातील बार्देस तालुक्यातल्या कृषी विभागीय कार्यालयात उद्या १८ डिसेंबर पासून म्हापसा शहरात सुरु होत आहे. तीन दिवशीय प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, कृषी मंत्री विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
कृषी तांत्रीक व्यवस्थापन एजन्सी (आत्मा), कृषी खाते, नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन मान्यवरां व्यतिरिक्त, महसूल मंत्री रोहन खंवटे, जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, उपसभापती मायकल लोबो, औद्योगीक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार ग्लेन टिकलो तसेच आमदार नीळकंठ हळर्णकर हे उपस्थित राहणार आहेत. कृषी विभागीय अधिकारी रघुनाथ जोशी यांनी या संबंधीची माहिती दिली.
प्रदर्शनातील वैशिष्ठ्याची माहिती देताना जोशी यांनी गोव्याची कृषी संपदा कृषी आराखडा दर्शवणारा तसेच पश्चिम घाटाची माहिती देणारा विशिष्ठपूर्ण असा नकाशा तयार करण्यात आल्याची माहिती दिली. त्यात गोव्यातील कुठल्या तालुक्याचे काय वैशिष्ठ आहे. चांगल्या प्रकारची लागवड कुठे घेतली जाते. नद्या, नाले, जंगल याची माहिती तसेच त्यात करण्यात येणाºया लागवडीची माहिती त्यातून देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. हे तीन दिवशीय प्रदर्शन उत्तर गोव्यातील शेतकºयांसाठी खास करुन बार्देसवासियांसाठी बरेच लाभदायी ठरणार असल्याचे ते म्हणाले.
आत्माचे अधिकारी अनिल होबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदर्शनात एकूण ३२ स्टॉल्सचा समावेश करण्यात आलेला आहे. यात कृषीसाठी लागणारी विविध अवजरे, खते तसेच इतर साहित्यांचा त्यात समावेश असल्याचे ते म्हणाले. त्यात महाराष्ट्रातून आलेल्या काही नामवंत कंपन्यांचा सुद्धा समावेश आहे. प्रदर्शनासाठी सिंधुदुर्गातील शेतकºयांचे पथक सुद्धा भेट देणार असल्याचे ते म्हणाले.
या स्टॉल्स व्यतिरिक्त शेतकºयांनी घेतलेल्या विविध उत्पादनाच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री कृषी बाजारातून करण्यात येणार आहे. महिला स्वयं सेवी संघटनानी तयार केलेल्या विविध खाद्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री सुद्धा यातून करण्यात येणार असल्याची माहिती होबळे यांनी दिली. उत्तर गोव्यातील सर्व शेतकºयांना एकत्रीत आणण्याच्या हेतूने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. या प्रदर्शनाला लागून विभागीय कार्यालयात बांधण्यात आलेल्या शेतकºयांसाठीच्या प्रशिक्षण सभागृहाचे उद्घाटन याचवेळी करण्यात येणार आहे.