- नारायण गावस
पणजी: वाढत्या जनजागृती व आधुनिक आराेग्य सेवेमुळे गाेव्यात एडस्वर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. समाजाकडून मिळत असलेले याेगदान व आधुनिक आरोग्य सुविधा यामुळे असे माेठे राेग नियंत्रणात येत असतात, असे आरोग्य खात्याचे सचिव अरुण कुमार मिश्रा यांनी सांगितले.
आराेग्य खाते आणि गाेवा एडस् नियंत्रण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एडस् दिनानिमित्त पणजी इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात कार्यक्रम आयाेजित करण्यात आला होता. यावेळी एडस् विषयी जनजागृती करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तसेच माेठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते. लेट कम्युनिटी लीड ही यंदाची थीम आहे.
पूर्वी एड्स झाल्यावर रुग्णाला तुच्छ मानले जायचे पण आता वाढती जनजागृती यामुळे लोकांनाही या विषयी माहिती मिळाली आहे. आता आरोग्य खाते या विषयी माेठ्याप्रमाणात जनजागृता केली आहे. शालेय पातळीवर जनजागृती करण्यात आली. तसेच गाेव्यात चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा पुरविली जात आहे. त्यामुळे अशा राेगांवर नियत्रंण अणण्यात आराेग्य खात्याला यश मिळत आहे. लाेकांना चांगली आराेग्य सेवा देण्यात गाेवा अग्रेसर आहे. अनेक याेजना राबविल्या जात आहे. असेही अरुण कुमार मिश्रा यांनी सांगितले.
सर्वांचे सहकार्य गरजेचे
एडस्वर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर जनजागृती झाली पाहिजे. आता आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान तसेच याेग्य अभ्यास यामुळे लोकांना एडस्वर नियंत्रण मिळत आहे. एडस्चा कसा फैलाव होतो. हे आता लोकांना कळाले आहे. त्यामुळे आता घाबरुन जाण्याची गरज नाही. याेग्य काळजी घेतली तर आम्ही या राेगापासून दूर राहु शकतो, असे यावेळी आराेग्य खात्याच्या संचालिका गीता काकोडकर यांनी सांगितले.राज्यात २००७ मध्ये १०९४ एडस् रुग्ण तक्रारी होत्या त्या आता २०२३ मध्ये २१९ वर आल्या आहेत. आता माेठ्या प्रमाणात एडस् रुग्ण संख्या कमी होत आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिसियाेमध्ये आधुनिक उपचार दिले जात आहे. हजारो रुग्ण एडस् चाचणी करतात. त्याचप्रमाणे एडस् रुग्णांना प्रती महिना २ हजार रुपये आर्थिक सहकार्य सरकारकडून दिले जात आहे. एकूण ४२७ जण याचा लाभ घेत आहेत. तसेच खास कदंब मध्ये त्यांना मोफत पास सेवाही पुरविली जात आहे. एकूण १, ८८४ याचा लाभ घेत आहेत.