लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यातील पाच हजार शालेय विद्यार्थ्यांन आता अक्षयपात्र फाऊंडेशन माध्यान्ह आहार पुरवणार आहे. शिक्षण खात्याने त्यासाठीचे कंत्राट त्यांना जारी केले आहे. राज्यातील विविध सरकारी शाळांमध्ये सध्या महिला स्वयंसाहाय्य गट माध्यान्ह आहार पुरवत आहेत. मात्र आता हे कंत्राट अक्षयपात्रला देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांना ते माध्यान्ह आहार पुरवतील.
पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अमलबजावणी होण्याची शक्यता आहे. चार महिन्यांची मुदत शिक्षण संचालक शैलेश झिंगडे म्हणाले, माध्यान्ह आहार पुरवण्यासाठी शिक्षण खात्याकडे एकूण पाच संस्थांनी निविदा भरली होती. यात एका गोमंतकीय संस्थेचाही समावेश होता. त्यापैकी अक्षयपात्र व उत्तर भारतातील स्त्रीशक्ती या संस्थांची निवड झाली होती. तर अक्षयपात्र फाऊंडेशन सर्व निकषांचे पालन केल्याने त्यांना हे कंत्राट बहाल केले आहे.
दरम्यान, शिक्षण खाते माध्यान्ह आहार पुरवण्याचे कंत्राट गोव्यबाहेरील एका संस्थेला देणार असल्याच्या चर्चेनंतर राज्यातील स्वयंसाहाय्य गटांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला होता. मुख्यमंत्री तसेच शिक्षण खात्याकडे त्यांनी तसे न करण्याची मागणीही केली होती. माध्यान्ह आहाराचे कंत्राट आम्हालाच मिळावे, आमच्यावर अन्याय करु नये, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. मात्र सरकारने अक्षय पात्र ला माध्यान्ह आहार पुरवण्यासाठी अखेर अक्षयपात्रला कंत्राट दिले आहे.
चार महिन्यांची मुदत
अक्षयपात्र फाऊंडेशन हे माध्यान्ह आहारात विद्यार्थ्यांना कोणता आहार देणार, त्यांचे किचन कसे असेल, कुठे असेल हे अद्याप ठरलेले नाही. राज्यातील सर्व सरकारी शाळांच्या विद्यार्थ्यांना ही अक्षयपात्र माध्यान्ह आहार पुरवणार नाही. सुरुवातीला त्यांनी केवळ ५ हजार विद्यार्थ्यांना हा आहार पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी आवश्यक ते किचन व अन्य सुविधा तयार करण्यासाठी त्यांना चार महिन्यांची मुदत दिल्याचे त्यांनी सांगितले.