- नारायण गावस
पणजी : सांतआंद्रे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच मुख्य ध्येय आहे. पूर्वीच्या आमदार सत्ताधारी पक्षात असूनही विकास कामे केली नव्हती. पण आम्ही करुन दाखविली, असे आरजीपीचे सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले. शिरदोणा येथील श्री नागवंती केळबाय संस्थान मंदिराच्या पेवर्स कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिरदोणाचे सरपंच, पंच सदस्य उपस्थित होते.
आमदार विरेश बोरकर म्हणाले, अल्प काळात आम्ही सांतआंद्रे मतदारसंघाचा सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. मतदार संघात अनेक कामे हाती घेतली आहे तर अनेक कामे पूर्ण केली आहे. येणाऱ्या काळात आम्ही आणखी कामे करणार आहोत. जर विरोधात असूनही आम्ही विकासकामात कुठे कमतरता केली नाही. आमदार निधीमार्फत अशी अनेक लहान कामे हाती घेतले आहेत. त्यामुळे काही आमदार विरोधात आहे म्हणून कामे करता येत नाही असे आरोप करतात. पण जर लोकांचे हीत जोपासायचे असेल तर अशी विकास कामे केली पाहिजे.
पुढे आमदार बोरकर म्हणाले, सांतआंद्रेत मतदार संघातील सर्व पंचायतीची प्रलंबित कामे हाती घेतली आहे. यात आम्ही कुठेच राजकारण केले नाही. पेवर्सचे कामे गटाराची कामे रस्त्याची कामे, पथदीप, शेटस् अशी विविध कामे पूर्ण करण्यात आहे. त्यामुळे सध्या मतदारसंघात पूर्ण विकसित होत आहे. आम्ही आरजी पक्षाने जी लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली जात आहे. सर्वांना एकत्र घेऊन तसेच विश्वासात घेऊन लोकांच्या समस्या सोडविल्या जात आहे.