लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : शिरोडा हे गाव प्रगतिशील गाव बनवण्यासाठी नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा, रस्ते तसेच गावच्या कला, संस्कृतीचे जतन करण्यासाठी सर्वांनी क्रियाशील राहणे गरजेचे आहे, असे मत सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले.
शिरोडा येथील श्री शिवनाथ देवस्थानच्या अग्रशाळेचे तसेच देवस्थानच्या कार्यालयाचे उद्घाटन सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणले, आरोग्याच्या समस्या वाढलेल्या आहेत. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय रोग समस्या वाढलेल्या आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी व निरोगी जीवन जगण्यासाठी आपली जीवनशैली बदलण्याची आवश्यकता आहे. यासाठी लोकांनी खेळ, व्यायाम याचबरोबर देवाचे ध्यान, भक्ती, योग यावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे.
यावेळी उद्घाटन सोहळ्यात सरपंच पल्लवी शिरोडकर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शिरीष बोरकर, शिवनाथ अग्रशाळा बांधकाम समितीचे अध्यक्ष जयंत मिरींगकर, स्थानिक पंच शिवानंद नाईक, उपसरपंच संदीप नाईक, देवस्थानचे अध्यक्ष म्हाडू प्रभुगावकर, सुरेश प्रभूदेसाई, संदेश प्रभूदेसाई, नीलेश बोरकर, रमेश फडके, अभय प्रभू व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. तसेच मार्गदर्शन केले.