ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 24 - संत जॉन बाप्तीस्त यांचा जन्मदिवस म्हणजेच सांजाव राज्यात शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. दुपार्पयत पाऊस नसल्याकारणाने कृत्रिम पावसाद्वारे लोकांना सांजावाची मजा घ्यावी लागली. दुपारी पाऊस आल्याने लोकांनी पावसात भिजून सांजावाची मजा लुटली. राज्यात एकामेकांच्या घरी भेटी देऊन सांजावच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ज्या घरात नववधू असते तेथे, तसेच ज्या घरात बाळ जन्माला आलेले असते तेथे फणस, अननस, आंबे, वाईन देऊन सांजाव साजरा केला. सर्वत्र डोक्यावर फुले, वेलीपासून तयार केलेले टोपी घालून व रंगबेरंगी कपडे परिधान करून ािस्ती बांधव आनंद साजरा करत होते. पवित्र ािस्ती शास्त्रप्रमाणो संत जॉन बाप्तीस्त गर्भात असताना त्यांची आई एलिझाबेथ या मेरी सायबीणीला भेटायला गेल्या होत्या. या वेळी संत जॉन बाप्तीस्त यांनी गर्भातच आनंदाने उडी घेतली. याचा प्रतिकात्मक आनंद सांजाववेळी विहिरीत, नदीत उडी घेऊन साजरा केला जातो. या वेळी लोकांनी विहीर व तळ्यात फेकलेल्या भेटवस्तू काढण्यासाठी उडय़ा घेऊन धमाल केली.
गोव्यात सांजाव उत्साहात
By admin | Published: June 24, 2016 7:52 PM