शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

गोमंतकियांची घरे राखण्यासाठीच कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती, मुख्यमंत्र्यांची माहिती

By वासुदेव.पागी | Published: November 15, 2023 4:29 PM

बेकायदेशीर वस्ती राखण्यासाठी कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती करणार काय असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की सर्व काही गोमंतकियांच्या हितासाठी केले जाणार आहे.

पणजी: कोमुनिदाद कायद्यात आणली जाणारी दुरुस्ती ही गोमंतकियांची घरे राखण्यासाठीच असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. कोमुनिदादच्या जमिनीवर असलेली ८० टक्के घरे ही गोमंतकियांची असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

बेकायदेशीर वस्ती राखण्यासाठी कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती करणार काय असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की सर्व काही गोमंतकियांच्या हितासाठी केले जाणार आहे. इथे कुणालाही झोपडपट्टी आणायची नाही. मागील कित्येक दशकांपासून कोमुनिदादच्या जमिनीत घरे बांधून राहणाऱ्या  गोमंतकियांना  संरक्षण देण्यासाठी सरकार योग्य निर्णय घेणार आहे. कोमुनिदादच्या जमिनीत बिगर गोमंतकियांची घरे नाहीत तर गोमंतकियांची आहेत. ८० टक्के घरे ही गोमंतकीयांचीच आहेत. सर्वाधिक घरे ही काणकोण तालुक्यात आहेत. काणकोणात सुमारे ५०० घरे तर साळगाव येथील १५० घरे पाडण्यासाठी नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने थिवी येथील कोमुनिदादच्या जमिनीवर अतिक्रमण करून तयार केलेली  लाला की बस्ती ही बेकायदेशीर वस्ती पाडण्याच्या आदेशावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे सरकार टीकेचे लक्ष बनले आहे. विशेषत: रिव्होल्युशनरी गोवन्सने ह्या मुद्द्यावर लोकांचे लक्ष केंद्रीत करताना सरकार बिगर गोमंतकियांच्या बेकायदेशीर वस्तीला कायदेशीर करू पाहत असल्याचा आरोप केला होता. 

गोवा सदनात कोकणी सक्तीची

दिल्ली येथील गोवा सदनात ज्या काही नोकऱ्या निर्माण होतात त्या सर्व पदांच्या भरतीसाठी कोकणी भाषेचे ज्ञान असणे आता सक्तीचे करण्यात आले आहे.  मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गोवा सदनातील विविध पदांसाठी कोकणी यापूर्वीही सक्तीची होती, परंतु ती अट मध्यंतरी शिथील करण्यात आली होती अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत