मडगाव: आईचे दुध पिउन तान्हुली झोपली खरी मात्र दुसऱ्या दिवशी ती उठलीच नाही. अवघ्या तीस दिवसांच्या त्या बालिकेचा मृत्यू झाला. गोव्यातील दक्षिण गोव्यातीलफातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आगाळी येथे ही हद्रदावक घटना मंगळवार दि. ५ रोजी घडली. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमिन नाईक पुढील तपास करीत आहेत.वरील कुटुंबीय हे मूळ उत्तर प्रदेशातील आहे.
कामानिमित ते आगाळी फातोर्डा येथे रहात होते. सोमवारी रात्री त्या बालिकेला आईने दुध पाजले होते. नंतर ते मुल व तिची आई या दोघेही झोपी गेल्या होत्या. सकाळी आईला जाग आल्यानतंर तिला आपले बाळ काहीच हालचाल करीत नसल्याचे आढळून आले. नंतर त्या बालिकेला त्वरीत येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले असता, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. दूध पाजत असताना, त्या बालिकेच्या श्वास नलिकेत दूध गेले असावे वा फुफ्फुसात दूध गेले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.