लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव: पुढील विधानसभा निवडणुकीत आमदार दिगंबर कामत यांचे योगिराज पुत्र कामत हे मडगावातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुक्त योगीराज कामत असताना काल, खुद्द दिगंबर कामत यांनी योगिराजच्या राजकीय एन्ट्रीचे संकेत दिले. योगीराजविषयीचा निर्णय मडगावचे लोक घेतील असे मोघम विधान माजी मुख्यमंत्री कामत यांनी केले.
मडगावात पत्रकारांशी बोलताना आमदार कामत यांनी राजकारणात प्रत्येकाने आपला मार्ग शोधण्याची गरज व्यक्त केली, मुलाबद्दल बोलताना म्हणाले, योगिराज निवडणूक काळात मला मोठे सहकार्य करतो. त्याची काम करण्याची पद्धत वेगळीच आहे. आगामी काळात मडगाववासीय त्याचा पुढचा मार्ग ठरवतील, असे सांगून कामत यांनी मडगावच्या राजकारणाची दिशा सांगून टाकली.
पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, मडगाव भाजपा मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, तसेच अन्य नगरसेवक उपस्थित होते. आमदार कामत म्हणाले. मडगाव शहरासाठी आता मास्टर प्लॅन तयार होत आहे. 'स्टुडिओ पोट कंपनी तो बनवीत आहे. मतदारसंघात एकूण १३० कोटींची विकासकामे गेल्या वर्षभरात होऊ घातली आहेत. त्यातील काही पूर्ण झाली आहेत, तर काहींची कामे चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.
जीएसआयडीसीची ८२ कोटी इतर ५० कोटींची कामे करण्यात येत आहेत. सोनसोडोवरील टाकाऊ व्यवस्थापनावर बोलताना कामत म्हणाले की, तुम्हा सर्वांना येत्या तीन चार महिन्यांत निकाल बघायला मिळेल. पार्किंगसंबंधी त्यांनी सांगितले की, येथील जुन्या मासळी मार्केट येथे पार्किंग प्रकल्प येणार आहे. सर्व फाइल तयार झाली आहे. सुडातर्फे लवकरच निविदा जारी होईल, तसेच पालिका इमारतीचेही नूतनीकरण होणार आहे.
गोव्यात मडगाव हा एकमेव मतदारसंघ आहे, जेथे विजेची चार सबस्टेशन आहेत. भूमिगत मलनिस्सारणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. रावणफोंड येथे सहापदरी पूल बांधला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणीचा कार्यक्रम लवकरच होईल. मोतीडोंगर येथे ५० खाटांचे आयुष्य इस्पितळाचे काम पूर्ण झाले आहे.
केंद्रात जाण्याचा प्रस्ताव नाहीच
यावेळी पत्रकारांनी कामत यांना भाजपा आपणाला केंद्रात नेणार, अशी चर्चा असल्याचे विचारले असता ते म्हणाले, कुणी मला याबाबत विचारलेले नाही, तसेच मी याबाबत कोणाशी बोललेलोही नाही. सध्या मी जेथे आहे तिथे चांगला आहे. मला मंत्रिपद नाही तरी ठीक आहे, आमदारकी नसली तरीही मी ठीक असेन, असेही त्यांनी सांगितले.
विजयला लगावला टोला
विजय सरदेसाई यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध आहेत; पण राजकारण वेगळे असते. सरदेसाई भाजपासोबत असताना मंत्री होते. त्यावेळी आपण त्यांना कधीच काही म्हटले नाही. आज मी भाजपात आहे, तर सरदेसाई विरोधात आहेत. मात्र, त्याने मला कुठलाही फरक पडत नाही, असा खोचक टोलाही कामत यांनी लगावला.
उद्यानासाठी १.४७ कोटी
आनाफोन्त उद्यानाचे एक १ कोटी ४७ लाख खर्चून सुशोभीकरण होत आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते मे किंवा जूनमध्ये त्याचे उद्घाटन होईल. इथे नवे कारंजे बसविले जातील. तसेच बालभवन केंद्रानजीक कोटी ३४ लाख खर्चून निवारा घर उभारण्यात येणार आहे.
रेल्वेस्थानकाला नवा साज
'आझादी का अमृत महोत्सव' योजनेंतर्गत मडगाव रेल्वेस्थानकाला नवा साज चढविला जाईल. आपण केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांच्याशी त्याबाबत चर्चा केली आहे. त्यांनी माझ्या प्रस्तावाला सकारात्मक होकार दिला आहे, असे कामत यांनी सांगितले. येथील जलतरण पूलही लवकरच पुन्हा सुरु होईल, असेही कामत यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"