म्हापसा: काशिराम म्हांबरे: खोर्ली-म्हापसा येथे अंगणवाडीला भाड्याने दिलेल्या एका खोलीला पहाटेच्या दरम्यान आग लावण्याचा प्रकार घडला आहे. लागलेल्या आगीत निशा कोरगावकर ( ७५ वय ) नामक वृद्ध महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेआहे.
अग्नीशमन दलाकडून प्राप्त महिनीनुसार आगीची घटना पहाटे ४.१५ च्या दरम्यान घडली. घराची मालक निशा कोरगांवकर यांनी आपल्या घराची खोली आंगणवाडीला दिली होती. खोलीतून धूर येऊ लागल्याने आग लागल्याचे आढळून आले. घटनेची माहिती उपलब्ध होताच अग्नी शमन दलाचे दलाचे उप अधिकारी प्रकाश कन्नीक यांच्या नेतृत्वाखाली जवान घटना स्थळी दाखल झाले. तोपर्यंत खोलीतील बरेचसे सामान आगीत जळून गेले होते. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीत सुमारे ३० हजार रुपयांची नुकसानी झाली असून १ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यास दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले.