लोकमत न्यूज नेटवर्कवास्को: गोव्यात होणार असलेल्या जिल्हा पंचायत निवडणूकीचा अर्ज मागे घेण्याचा वेळ संपल्यानंतर साकवाळ जिल्हा पंचायतीतून अॅड. अनिता थोरात यांचा बिनविरोध विजय झाल्याचे निवडणूकीचे निर्वाचन अधिकारी परेश फळदेसाई यांनी घोषीत केले. अनिता थोरात यांचा साकवाळ जिल्हा पंचायतीवर बिनविरोध सदस्य म्हणून निवड झाल्याने भाजप ने गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणूकीत विजयाचे खाते उघडले आहे. साकवाळ भागातील नागरीकांनी आपल्यावर पूर्ण विश्वास दाखवून अनिता थोरात यांना बिनविरोध जिंकण्याची संधी दिलेली असून जनतेच्या विश्वासावर खरे ठरून भविष्यात सुद्धा उत्तम विकास करणार असल्याचे पंचायतमंत्री मवीन गुदिन्हो यांनी याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना सांगितले. साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघ यंदाच्या निवडणूकीत महीलासाठी राखीव ठेवण्यात आला होतामुरगाव तालुक्यात असलेल्या साकवाळ जिल्हा पंचायतीत निवडणूकीसाठी पंचायतमंत्री मवीन गुदिन्हो यांच्या समर्थक अनिता थोरात यांनी भाजप वरून अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनिता थोरात वगळता (अनिता थोरात यांच्या बाजूने अन्य एका उमेदवाराने डमी अर्ज दाखल केला होता) अन्य कोणाचाच अर्ज आला नसल्याने त्यांचा बिनविरोध विजय होणार असल्याचे निश्चित झाले होते. कॉग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला होता, मात्र असे असताना सुद्धा त्या उमेदवाराने अर्ज भरला नसल्याने मागच्या काही दिवसात हा एक बराच चर्चेचा विषय ठरला होता. शनिवारी (दि.७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर मुरगाव तालुक्यातील जिल्हा पंचायतीचे निर्वाचन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी परेश फळदेसाई यांनी अनिता थोरात यांचा बिनविरोध विजय झाल्याचे घोषीत करून त्यांना याबाबतचे पत्र देण्यात आले. अनिता थोरात यांनी विजय मिळवून जिल्हा पंचायत निवडणूकीत भाजप चे विजयाचे खाते उघडले आहे. जिल्हा पंचायत सदस्या म्हणून निवडून आल्याचे पत्र अनिता थोरात घेण्यासाठी आल्या असता त्यांच्याबरोबर पंचायतमंत्री मवीन गुदिन्हो, चिखलीचे सरपंच सेबी परेरा, साकवाळचे सरपंच गीरीश पिल्ले, चिखलीचे उपसरपंच कमलाप्रसाद यादव तसेच इतर उपस्थित होते. थोरात यांना विजयी घोषीत केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना साकवाळ जिल्हा पंचायतीतील मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवल्यानेच त्यांनी माझा उमेदवार अनिता थोरात यांना बिनविरोध निवडून दिल्याचे सांगितले. गोव्यात होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणूकीत भाजपचाच विजय होणार असून दक्षीण तसेच उत्तर गोव्यात दोन्ही जिल्हा पंचायतीवर भाजपचाच अध्यक्ष होणार असा विश्वास गुदिन्हो यांनी व्यक्त केला. विरोधकांना त्यांचा येथे पराभव होणार असल्याची जाणीव झाल्याने त्यांनी येथे (साकवाळ) निवडणूकीत न उतरता पळ काढल्याची टीका गुदिन्हो यांनी करून आता ते खोटे आरोप करत असल्याचे सांगितले. विरोधकांना गोव्यात होणार असलेल्या जिल्हा पंचायत निवडणूकीत त्यांचा पराभव होणार असल्याची पूर्ण खात्री झाल्याने त्यांनी खोटे आरोप करण्यास सुरवात केली असून जनता त्यांच्या या खोट्या आरोपांना बळी पडणार नसल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले. भाजप ने गोव्यात केलेला विकास जनतेला माहीत असून जनता या निवडणूकीत सुद्धा भाजपबरोबर राहणार असा विश्वास गुदिन्हो यांनी शेवटी व्यक्त केला.बिनविरोध साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून निवडून आलेल्या अनिता थोरात यांनी याप्रसंगी बोलताना मवीन गुदिन्हो यांच्या पाठींब्या मुळेच आपला बिनविरोध विजय झाल्याचे सांगितले. गोव्याच्या व जनतेच्या हीतासाठी आपण येणाºया काळात काम करणार असे त्यांनी पत्रकारांना शेवटी माहीतीत सांगितले.कुठ्ठाळी जिल्हा पंचायत मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला भाजप चा पाठींबा: पंचायतमंत्री मवीन गुदिन्होकुठ्ठाळी जिल्हापंचायत मतदारसंघात भाजपने उमेदवार का ठेवला नाही असा सवाल पंचायतमंत्री मवीन गुदिन्हो यांना केला असता तेथे एका अपक्ष उमेदवाराला पाठींबा देण्याचे आम्ही ठरवल्याची माहीती त्यांनी दिली. कुठ्ठाळी जिल्हा पंचायत मतदारसंघात अॅथनी वास हे एकमेव अपक्ष उमेदवार असून गुदिन्हो यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप अँथनी वास यांना पाठींबा देत असल्याचे एके प्रकारे स्पष्ट झाले आहे. कुठ्ठाळी जिल्हा पंचायतीत अॅथनी वास यांच्याविरूद्ध आप वर पोब्रीस वाझ व कॉग्रेस वर लुपीनो झेवीयर निवडणूक लढवणार आहेत. यंदा कुठ्ठाळी जिल्हा पंचायत मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे
अनिता थोरात यांची साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून बिनविरोध विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 9:06 PM