पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने उपचारासाठी काहीकाळ ते अमेरिकेला होते. सध्या ते दिल्लीला ते उपचार घेत आहेत. त्यामुळे राज्याला सेनापतीच नसल्याने प्रशासन कोलमडले आहे. मंत्रीही आजारी असल्याने भाजपा राष्टीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंत्रिमंडळात फेररचना केली. यातून भाजपामधील अस्थिरतेचे दर्शन घडले. याला काहींनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. सध्या प्रदेशाची प्रकृतीच बिघडली असून ‘गोव्याला आजारी राज्य’ म्हणून जाहीर करावे, अशी उपरोधक टीका महाराष्ट राज्यसभा खासदार व शिवसेने नेते संजय राऊत यांनी केली.
गोव्या दौ-यावर आलेले राऊत यांनी गुरुवारी पणजीत शिवसेनेच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राऊत म्हणाले, गोवा राज्य शारीरिक व मानसिकदृष्ट्या आजारी बनले आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकां एकत्र घेण्यासाठी भाजपाची धडपड सुरु असल्याचे दिसते. त्यासाठी भाजपा हे दिवस ढकलत आहेत. राज्यात प्रबळ सत्ताधारी तसेच विरोधकही नाहीत. त्यात सामान्य जनतेची फरफट होत आहे. मंत्रिमंडळात एकवाक्यता नाही. मंत्री व आमदरांमध्ये वैचारिक प्रदूषण दिसते. याचा राज्याचा विकासावर परिणाम झाला आहे. राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाल्याचे दिसते. याप्रकाराकडे शिवसेना तटस्थ भूमिकेतून पाहते व आपली संघटना बांधणीचे काम करत आहेत.
शिवसेना लोकसभा निवडणुका लढविणारयेणा-या लोकसभा निवडणुका शिवसेना लढविणार असून उत्तर व दक्षिण गोव्यात शिवसेना आपले उमेदवार ठेवणार अशी घोषणाही राऊत यांनी केली. मागच्या विधानसभेत गोवा सुरक्षा मंचसोबत युती करून निवडणूक लढविली होती. मात्र, हवे तसे यश शिवसेनेला त्या वेळी मिळाले नाही. मात्र शिवसेनेला भाजप किंवा काँग्रेस तसेच इतर पक्षांपेक्षा राजकारण व निवडणुकांचा जास्त अनुभव आहे. शिवसेना हा सर्वांत जुना पक्ष असल्याचे राऊत म्हणाले.
नाना-तनुश्री वादात राजकीय पक्षाने पडू नये‘हॉर्न ओके प्लीज’च्या गाण्याच्या शूटवेळी नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केले, असा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी अभिनेता पाटेकर यांच्यावर केला होता. याप्रकारानंतर बॉलीवूडमध्ये दोन गट पडले असून वादंग निर्माण झाला आहे. यातच काही राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर महाराष्ट नवनिर्माण सेनेला उघडपणे पाटेकर यांना आपला पाठिंबा दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने सुद्धा पाटेकर यांच्या समर्थनाथ वक्तव्य केले होते. मात्र, गुरुवारी राऊत म्हणाले, नाना-तनुश्री यांच्यातील वादात कोणत्याही राजकीय पक्षाने पडू नये असे वाटते, असे वक्तव्य त्यांनी केले.