लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दक्षिण पश्चिम रेल्वेने गोवा ते अयोध्या 'आस्था स्पेशल एक्स्प्रेस' ही विशेष रेल्वे घोषित केली आहे. रेल्वे गाडी क्रमांक ०६२०५ वास्को रेल्वे स्थानकावरून सुटेल व अयोध्येजवळील दर्शन नगर रेल्वे स्थानकावर शेवटचा थांबा घेईल.
वास्को येथून सोमवारी १२ आणि २६ फेब्रुवारी तर दर्शननगर येथून शुक्रवार, १६ फेब्रुवारी आणि १ मार्च अशी ही रेलगाडी सुटेल. माजोर्डा, मडगाव, करमळी, रत्नागिरी, पनवेल, वापी, कोटा, तुंडला, प्रयागराज, मिर्झापूर या भागातून ती जाईल. या रेल्वेत २२ कोच असतील आणि २,७९१ कि.मी.चा एकेरी प्रवास असेल.