किशोर कुबल
पणजी : शॅकसाठी येत्या २७ पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत असून ३ नोव्हेंबर रोजी लॉटरी काढून शॅक वितरण केले जाईल. पर्यटन संचालक सुनिल आंचिपाका यांनी यासबंधीची सूचना जारी केली आहे.
पाच वर्षे व त्यावरील अनुभवी, १ ते ४ वर्षांचा अनुभव असलेले तसेच या व्यवसायात नव्याने येऊ इच्छिणारे कोणताही अनुभव नसलेले अशा ती वर्गवारीत शॅकवाटप करण्यात येणार आहे. अर्जासोबत १० हजार रुपये शुल्क (विना परतावा) भरणे आवश्यक आहे.
उत्तर गोव्यात २५४ तर दक्षिण गोव्यात १०५ शॅक वितरित केले जाणार आहेत. गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने शॅकना मंजुरी दिलेली आहे.
मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी शॅक व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांची गाह्राणी ऐकली. आमदार मायकल लोबोही त्यावेळी उपस्थित होते. पर्यटक हंगाम सुरु झाला तरी शॅक वितरण न झाल्याने व्यावसायिक नाराज आहेत.