शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

खंडणी मागून मिळवलेला पैसा लष्कराला नको, उद्धव यांचा राजना टोला

By admin | Published: October 23, 2016 1:02 PM

'ऐ दिल है मुश्किल'च्या वादावरून उद्धव ठाकरे यांनी मनसेसह राज ठाकरेंना जोरदार चपराक लगावली आहे.

ऑनलाइन लोकमत पणजी, दि. 23 - 'ऐ दिल है मुश्किल'च्या वादावरून उद्धव ठाकरे यांनी मनसेसह राज ठाकरेंना जोरदार चपराक लगावली आहे. "खंडणी मागून मिळवलेला पैसा लष्कराला नको असला पाहिजे. लष्कराला स्वतःचा स्वाभिमान आहे", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

तर कालच पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या भूमिकेमूळे वादात सापडलेला "ऐ दिल है मुश्कील" चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अडथळ दूर झाला. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर काही अटींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या चित्रपटाच्या विरोधाची तलवार म्यान केली. चित्रपटाला नफा वा तोटा झाला, तरी निर्माते सैनिक कल्याण निधीमध्ये पाच कोटी रुपये देतील. पाक कलाकार असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी प्रत्येकी पाच कोटी रुपये सैनिक कल्याण निधीला द्यावेत, असे राज म्हणाले होते. या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना खंडणीचा पैसा नको म्हणत शरसंधान साधलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "गोव्याकडे आजवर शिवसेनेचे दुर्लक्ष झाले. मात्र यापुढे चांगल्या माणसांना सोबत घेऊन आम्ही गोव्याचे राजकारण करणार आहोत". तसेच सुभाष वेलिंगकर यांच्यासोबत शिवसेना पुढील वाटचाल करणार असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वेलिंगकरांसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, "मराठी माझी माय आणि कोकणी माझी मावशी आहे. शिवसेना यापुढे केवळ निवडणुकांपूरतीच गोव्यात येणार नाही. आताही शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी मी येथे आलोय. येथील चांगल्या माणसांना सोबत घेऊन आम्ही गोव्यात पुढे जाणार आहोत. सुभाष वेलिंगकर यांच्याशी शनिवारी चर्चा झाली. शिवसेना त्यांच्यासोबत पुढील वाटचाल करणार आहे. मात्र जागावाटपावबाबत दिवाळीनंतर बैठकीत चर्चा होईल. यावेळी गोव्यातील सत्ताधारी भाजपालाही शिवसेना पक्षप्रमुखांनी फटकारले. समान विचारांची माणसे गोव्यात असल्याने त्यांच्या कामात आडकाठी नको म्हणून आम्ही गोव्यातील राजकारणापासून दूर होतो. पण गोव्यातील जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांबाबत नाराजी आहे. मातृभाषेचा प्रश्न हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. असे ठाकरे म्हणाले. तसेच महाराष्ट्राबाहेर शिवसेना आणि भाजपा नेहमीच स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आली आहे. गोव्यात शिवसेना-भाजपा युती नसल्याने युती तुटण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.