- पूजा नाईक प्रभूगावकर
पणजी - शिरदोण येथील अपघातास कारणीभूत दुचाकीस्वाराला जो पर्यंत अटक होत नाही तो पर्यंत आपल्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा या अपघातात ठार झालेल्या संजना सावंत हिच्या वडिलांनी दिला आहे.
या अपघातात आपण जवळपास सर्वच गमावले आहे. मोठी मुलगी संजना ही अपघातात गेली. तर धाकटी मुलगी अक्षता ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहे.या अपघातास कारणीभूत असलेला दुचाकस्वाराकडे शिकवणी परवाना होता. यास्थितीत जर तो दुचाकी चालवत होता, तर त्याच्या मागे आणखीनही कोण व्यक्ती पाहिजे होती. परंतु तसे काहीच नव्हते असे त्यांनी सांगितले.
या अपघातात दोषी दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. पोलिसांनी त्यालाही अटक करावी. तसेच त्याचे वय कमी असल्याने त्याच्या पालकांनाही अपघातास जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करावी. आपल्याला न्याय हवा आहे.जो पर्यंत ताे मिळत नाही, तो पर्यंत मुलीचा मृतदेह स्विकारणार नाही असेही तिच्या वडिलांनी स्पष्ट केले. बांबोळी येथील गोमेकॉत आपल्या नातेवाईंकांसोबत आले असता ते बोलत होते.