लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: साकवाळ, एमईएस कॉलेज जवळील बंगल्यात चोरीसाठी आलेल्या चोरट्यांचा पोलीस पोचल्याने बेत फसल्यानंतर घटना स्थळावरून पळताना पोलीसांवर दोन गोळ्या झाडलेल्या तीन चोरट्यांपैंकी दोघांना पोलीसांनी मेरठ, उत्तरप्रदेश येथून गजाआड केले आहे.
दक्षिण गोवा पोलीसांच्या खास पथकाने दिल्ली आणि उत्तरप्रदेश पोलीसांच्या मदतीने दोघांना गजाआड केले असून त्यांची नावे अनस समशाद अंन्सारी (वय २२) आणि साजीद समशाद अन्सारी (वय ३६) अशी असल्याची माहीती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी दिली. अटक केलेले दोघेही आरोपी मेरठ, उत्तरप्रदेश येथील असून पोलीसांनी गजाआड केलेल्या दोघापैकी एकाला विमानाने दाबोळी विमानतळावर आणल्यानंतर पुढच्या चौकशी - कारवाईसाठी त्याला घेऊन गेले तर दुसरा आरोपी गुरूवारी उशिरा रात्री गोव्यात पोचण्याची शक्यता आहे.
सोमवारी पहाटे २ वाजता साकवाळ येथील डॉ. आमोणकर यांच्या बंगल्याचा दरवाजा फोडत असताना शेजाऱ्याने ते पाहीले व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीसांचे पथक तातडीने घटनास्थळाच्या दिशेने निघाले. पोलीस येताना दिसताच चोरटे दुचाकीवरून पळाले. पळताना पोलीस त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चोरट्यांना दिसून येताच त्यापैंकी एकाने पोलीसांच्या दिशेने देशी बनावटीच्या पिस्तूलाच्या दोन गोळ्या झाडल्या. त्यात एक होमगार्डच्या गुडघ्याला कीरकोळ जखम झाली तर दुसरी गोळी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक यांच्या डोक्यावरून गेल्याने तो सुखरुप बचावला.
चोरीचा प्रयत्न आणि पोलिसांवर गोळीबार केलेल्या चोरट्यांना गजाआड करण्यासाठी पोलीसांनी सर्व यंत्रणांचा वापर करून त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. पोलीसांवर गोळीबार करण्याबरोबरच विविध चोरी प्रकरणात शामील असलेल्या चोरट्यांना गजाआड करण्यासाठी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को आणि मडगाव पोलीस उपअधीक्षक तसेच वेर्णा, वास्को, मायणा कुडतरी, फार्तोडा, मुरगाव पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीसांचा समावेश करून पोलीसांचे खास पथक तयार केले. सर्व यंत्रणांचा वापर करून पोलीसांनी त्या आरोपींना गजाआड करण्यासाठी अथक परिश्रम लावल्यानंतर त्यापैंकी एक आरोपी मेरठ, उत्तरप्रदेश येथे असल्याची खात्रीलायक माहीती पोलीसांना प्राप्त झाली.
त्वरित तयार केलेल्या त्या खास पोलीस पथकापैंकी काही पोलीस अधिकारी आणि कोंन्स्टेबल दिल्लीला जाऊन पोचले. त्यानंतर दिल्ली आणि उत्तरप्रदेश पोलीसांच्या मदतीने त्या आरोपीचा शोध घेण्यास सुरवात करून अखेरीस त्याला मेरठ, उत्तरप्रदेश येथून गजाआड केल्याची माहीती सूत्रांनी दिली. अनस अन्सारी याला प्रथम गजाआड केल्यानंतर पोलीसांनी त्याच्याशी कसून चौकशीला सुरवात केली असता त्यांनी दुसºया आरोपीबाबत पोलीसांना माहीती दिली. पोलीसांनी त्वरित पावले उचलून दुसरा आरोपी साजीद अन्सारी या आरोपीला मेरठ, उत्तरप्रदेश येथून अटक केल्याची माहीती प्राप्त झाली. अटक केलेल्या त्या दोन आरोपीपैंकी एकाला गुरूवारी दुपारी ३.२० वाजता पोलीस सुरक्षेने गोव्यात आणले असून दुसरा आरोपी गुरूवारी रात्री गोव्यात पोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दक्षिण गोवा पोलीसाच्या खास पथकाने त्वरित कारवाई करून दोन आरोपींना गजाआड केल्याने त्यांना गोवा पोलीस महासंचालकांनी २५ हजाराचा पुरस्कार जाहीर केल्याची माहीती दिली दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अभिषेक धानिया यांनी दिली.साकवाळ बंगल्यात चोरीसाठी आलेल्या आणि गोळीबार केलेल्या प्रकरणात अटक केलेले अनस आणि समशाद हे आरोपी वेर्णा आणि मायणा कुडतरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत झालेल्या सोन्याची सरपळी हीस्कावण्याच्या आणि चोरीच्या प्रकरणात शामील असल्याची माहीती पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी दिली. तसेच ह्या आरोपींनी चिखली, दाबोळी येथील एकाच्या गळ््यातून सोन्याची सरपळी हीस्कावून पोबारा काढला होता. ह्या आरोपींचा नुवे पोलीस स्थानकाच्या हद्दीतून झालेल्या एका दुचाकीच्या चोरी प्रकरणात हात असल्याची माहीती धानिया यांनी दिली. तसेच ह्याच आरोपींनी लोटली येथील एका वृद्ध महीलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या हीस्कावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न अयश्स्वी ठरला होता. ह्या टोळीचे अन्य दोन साथिदार (आरोपी) अजून फरार असून त्यांना गजाआड करण्यासाठी दक्षिण गोव्यातील पोलीसांचे पथक सर्व मार्गाने त्यांचा शोध घेत असल्याची माहीती अभिषेक धानिया यांनी दिली.मेरठ, उत्तरप्रदेश येथून अटक केलेल्या अनस, साजीद आणि त्यांच्या टोळीतील इतर साथिदारांचा हैद्राबाद, मुंबई आणि उत्तरप्रदेश येथील काही शहरात चोरी इत्यादी गुन्हेगारी प्रकरणात हात असल्याचे चौकशीत समजल्याची माहीती पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी दिली. पोलीसांनी दुसरा आरोपी साजीदशी चौकशी केली असता हैद्राबाद, मुंबई आणि उत्तरप्रदेश येथील काही शहरात चोरीची प्रकरणे केल्यानंतर त्यांनी गोव्यात येऊन चोरी इत्यादी गुन्हेगारीची प्रकरणे केल्याचे उघड झाले. गोवा पोलीस लवकरच ज्या दुसºया राज्यात ह्या आरोपींनी गुन्हे केलेले आहेत तेथील संबंधित पोलीस स्थानकांना माहीती देणार असल्याचे धानिया यांनी सांगितले.मुरगाव पोलीस उपअधीक्षक सलीम शेख आणि इतर पोलीस कोंन्सटेबल दिल्लीतच असल्याची माहीती पोलीस सूत्रांकडून मिळाली असून लवकरच राहीलेल्या दोन चोरट्यांना गजाआड होण्याची शक्यता वाढलेली आहे.