पणजी - कला ही समस्त मानवजातीला एकत्र आणण्याचे साधन आहे. अनेक देश या प्रवाहाच्या माध्यमातून जवळ येतात, हे लक्षात घेतले पाहिजे. युवा वर्गाने देशातील समृद्ध आणि पारंपरिक कलेकडे वळावे व ती जगासमोर आणावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे, असे प्रतिपादन सेरेंडिपीटी कला ट्रस्टचे संस्थापक सुनील कांत मुंजाळ यांनी केले.
दिल्ली येथील सेरेंडिपिटी आर्ट्स ट्रस्टतर्फे आयोजित दुस-या ‘सेरेंडिपिटी महोत्सवा’चे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते आदिल शाह वाडय़ात झाले. त्याप्रसंगी सुनील कांत मुंजाळ बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्य़ेकर, उद्योजक श्रीनिवास धेंपो, दत्तराज साळगावकर, टाटा कन्सल्टन्सीचे अमित निवसरकर, दालमिया ग्रुपचे दालमिया दाम्पत्य, देश-विदेशातून आलेले कलाकार, साहित्यिक यांची उपस्थिती होती.
मुंजाळ म्हणाले की, आत्तार्पयत आपली संस्कृती आणि इतिहास हा मंदिरांच्या माध्यमातून दिसत होता. ऐतिहासिक कला आणि संस्कृती समोर आणण्याचे कसब कलेत असते, ती कला पुढे आणण्याचे काम युवा कलाकारांनी केले पाहिजे, याकरिता असा महोत्सव प्रेरणादायी ठरतो. सांस्कृतिक वारसा हा आपला भूतकाळ असून, तोच भविष्य काळ आहे. गोवा हे राज्य सर्वसमावेशक असून, ते ऐतिहासिकही आहे. त्यामुळेच या महोत्सवासाठी या राज्याची निवड करण्यात आली आहे. या महोत्सवाच्या आयोजनात आत्तार्पयत झटलेल्या अनेकांचा मुंजाळ यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.
गोव्याच्या संस्कृतीत भर!
ज्या कलेवर नजर स्थिरावली जाते, तो महोत्सव म्हणजे सेरेंडिपीटी. गोव्याने अशा महोत्सवावर लक्ष केंद्रीत करायला हवे. गोव्याच्या संस्कृतीत या महोत्सवामुळे आणखी भर पडणार असून, ती एका विशिष्ट उंचीवर पोहोचली जाणार आहे, असे सांगत मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी देत महोत्सवाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर गोवा हे नेहमी कलाकारांचे स्वागत करीत आले आहे, तसेच अशा महोत्सवांनाही महत्त्व देत आल्याचे त्यांनी नमूद केले.