पणजी - एटीएम मशिनला स्टीमर लाऊन एटीएम कार्डमधील गोपनीय माहिती चोरणाºया एका रोमानिया देशाच्या नागरिकाला पणजी पोलिसांनी पकडले. एक वर्षापूर्वी कॉर्पोरेशन बँकेतील खाते दारांची खाते साफ करून हादरा देणारा गुन्हेगारही हाच असल्याची शक्यताही पोलिसांना वाटत आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आलेक्स पेट्रिका असे असून तो रोमानिया देशचा नागरीक आहे. गोव्यात तो पर्यटन व्हीसावर आला होता आणि कळंगूट येथे तो रहायला असतो. पंजाब नेशनल बँकेचे व्यवस्थापक संतोष कुमार यादव यांनी यापूर्वी पणजी पोलीस स्थानकात तशी तक्रार नोंदविली होती. त्यामुळे पोलीस सतर्क होवून गस्ती घालत होते. प्पणजी चर्चस्क्वेअर परिसरात हा आलेक्स संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांनी त्याला पाहिले. त्याला पोलिसांनी इथे काय करतो असे विचारल्यानंतर तो भांबावला आणि पळायला लागला. त्यानंतर पोलिसांनी पाटलाग करून त्याला पकडले आणि नंतर अटक केली. पंजाब नेशनल बँकच्या एटीएमलाच स्कीमर लावून ठेऊन तो इकडून तिकडे फिरत होता आणि त्यावेळीच तो पोलिसांच्या तावडीत सापडला. अटक केल्यानंतर तो माहिती देण्यास तयार नव्हता. परंतु पोलिसी दंडुक्यांचा प्रसाद खाल्यावर त्याने पंजाब नेशनल बँकेच्य एटीएमला स्कीमर लावून ठेवल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला घेऊन पोलीस त्या मशीनजवळ गेले. स्कीमर स्क्रीनच्या वर असलेल्या भागात अशा पद्धतीने चिकटविण्यात आला होता की एटीएमचा पासवर्ड मारताना सहज टीपला जाईल. स्कीमर काडण्यासाठीही खूप शक्ती लावावी लागली. त्यानेच तो स्कीमर नंतर काढून दिला. या बँकेतील खाते दारांच्या खात्यांची माहिती त्याने मिळविली असली तरी त्याचा उपयोग करून अद्याप खाते साफ करण्याचे उद्योग सुरू केले नव्हते. शक्य तितकी माहिती घेऊन न ंतर एकदम मोठा हात मारण्याचा त्याचा डाव असावा असे पोलीसांना वाटते. उपनिरीक्षक अरूण देसाई या प्रकरणात तपास करीत आहेत.
वर्षापूर्वी यानेच मारला होता डल्ला?एक वर्षापूर्वी पर्वरी येथील एटीएममधून कॉर्पोरेश्न बँकेची खाती साफ करणारा संशयितही हाच असण्याची शक्यता आहे. कारण त्यावेळी त्या संशयिताबरोबर असलेल्या माणसाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तेव्हा पळून गेलेला माणूस रोमानिया देशाचा असल्याचे त्याने सांगितले होते. आलेक्सही रोमानियाचाच आहे. तसेच त्या संशयिताचे एटीएम कॅमºयाद्वारे टीपले गेलेले छायाचित्रही आलेक्ससारखेच दिसत आहे.