मडगाव: फ्लॅट अगोदर दुसऱ्याला विकला असता, अन्य एका महिलेला तो फ्लॅट विकण्यासाठी संबधी विक्री करारनामा करुन बारा लाखांचा गंडा घालण्याची एक घटना गाेव्यात उघडकीस आली आहे.
दक्षिण गोव्यातील फातोर्डा पोलिस ठाण्यात यासंबधी रितसर तक्रार नोंद झाली असून, संशयित भास्कर बेगारी याच्याविरोधात पोलिसांनी भादंसंच्या ४२० कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पाेलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्हाय. गावकर पुढील तपास करीत आहेत.सुरेंद्र नाईक हे तक्रारदार आहेत.
संशियताने तक्रारदाराच्या आईला फसविले आहे. १ ऑगस्ट २०१४ साली वरील घटना घडली होती. येथील सब रजिस्टार कार्यालयात संशयिताने फ्लॅट विक्रीबाबत करारनामा केला होता. मात्र त्यापुर्वीच संशयिताने हा फ्लॅट अन्य एकाला विकला होता. आपण फसविलो गेले हे लक्षात आल्यानंतर संबधितांनी फातोर्डा पोलिस ठाण्यात याबाबत रितसर तक्रार नोंद केली.