पणजी : एका बाजूने पोलीस कोठडीत असलेल्या चर्चिल आलेमाव यांच्या घरावर छापा टाकून त्यांचा जामीन मिळविण्याचा मार्ग खडतर करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे, तर दुसऱ्या बाजूने बुधवारी होणाऱ्या सुनावणीत माजी मुख्यमंत्री आणि जैका प्रकरणातील मुख्य संशयित दिगंबर कामत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज निष्फळ ठरवून त्यांना पोलीस कोठडीत घेण्याच्या पवित्र्यात पोलीस आहेत. बुधवारच्या न्यायालयीन लढाईसाठी कामत यांच्यातर्फे सुरेंद्र देसाई हे युक्तिवाद करणार आहेत, तर क्राईम ब्रँचतर्फे जी. डी. कीर्तनी हे युक्तिवाद करणार आहेत. पोलिसांकडे कामत यांच्या विरोधात नोंदविण्यात आलेल्या जबानींशिवाय कोणतेही पुरावे नसल्याचा दावा त्यांच्या वकिलातर्फे केला जाणार, हे स्पष्ट आहे. तसेच पोलिसांना हवी असलेली आणि कामत व चर्चिल यांचे शेरे असलेली कथित फाईल अद्याप पोलिसांना सापडली नसल्याचाही ते फायदा उठविण्याचा प्रयत्न करतील. दुसऱ्या बाजूने पोलिसांतर्फे आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या ५ जणांचे जबाब हाच ठोस पुरावा (पान २ वर)
कामत यांच्या जामिनाकडे लक्ष
By admin | Published: August 12, 2015 1:59 AM