पणजी- गोव्यात येणा-या देशी व विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोवा पोलिसांनी एरीएल सर्वेलन्स पद्धत सुरू केली आहे. थेट आकाशातून एखाद्या जागेची टेहळणी करण्याच्या या तंत्रज्ञानाचा उपयोग हा संपूर्ण देशात पहिल्यांदाच करण्यात आल्याचे गोवा पोलिसांनी म्हटले आहे. ड्रोणच मदतीने ही टेहळणी होणार आहे. विशेषत: गोव्यात मोठ्या प्रमाणावर होणा-या संगित पार्टी, नवीन वर्ष सोहळे या सारख्या प्रसंगी गोव्यात मोठ्या प्रमाणावर देशी आणि विदेशी पर्यटक येत असतात. अशा पार्ट्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशावेळी सुरक्षेच्या दृष्टीने या सर्व्हेलन्सचा वापर केला जाणार असल्याची माहिती अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली. अलिकडेच झालेल्या ईडीएम पार्टीच्यावेळीही या पद्धतीचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात आला होता आणि तो यशस्वीही झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी २ लाखांवर पर्यटक जमले होते. यावेळी एरीएल सव्हेलन्स द्वारे परिस्थीतीचा आढावा घेणे शक्य झाले. या पद्धतीत झुमिंग द्वारे अधिक स्पष्ट छायाचित्रे मिळत असल्याचे कश्यप यांनी सांगितले. अधिक्षक कार्तिक कश्यप अणि अरविंद गावस हे या संपूर्ण व्यवस्थेवर देखरेख ठेवणार असून त्यांना त्याविषयी विषेश पशिक्षणही देण्यात आले आहे. बंगळूर येथील स्टार्टप आयआयओ टेक्नोलोजी प्रायव्हेट लिमिटेडच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
काळोखात दृष्ये टिपणारे कॅमरेकाळोखात राहूनही कुणी कसल्या हरकती करीत असेल तरी त्या टीपण्याची क्षमता असलेले थर्मल कॅमरे या सिस्टममध्ये बसविण्यात आले आहेत. माणसांच्या अंगातील तापमानामुळे ते टीपले जाणार आहेत आणि बसल्या जागी त्याची फुटेज पाहणे शक्य असल्याचे कार्तिक यांनी सांगितले. द्रोनची क्षमता ही प्रचंढ आहे आणि ५ किलोमीटर पर्यंतच्या त्रिच्येच्या अंतरावरून त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. कळंगूट येथील पोलीस स्थानकाच्या इमारतीत वरून सोडलेला द्रोन बागा, हणजुणे, कांदोळीची फेरी घेऊन सहज येऊ शकतो इतक्या क्षमतेची ही व्यवस्था आहे.
वाहतूकीवरही लक्ष्यराज्यात वारंवार ठप्प होणारी वाहतूक व्यवस्था सुधारण्यास या सर्व्हेलन्सवचा फायदा होणार आहे. कुठे वाहतूक व्यवस्था बिघडली आहे याचा अचूक वेध त्याद्वारे घेणे शक्य होणार आहे. त्यासाठी आणखी द्रोनची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.